💨गुरुवारी दिवसभर प्रदूषित हवेची चादर शहराच्या वातावरणात पसरलेली आली दिसून - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 6, 2019

💨गुरुवारी दिवसभर प्रदूषित हवेची चादर शहराच्या वातावरणात पसरलेली आली दिसून💁‍♂पुणे शहरात काही दिवसांपूर्वी दिल्लीत निर्माण झालेली भीषण प्रदूषण परिस्थिती आठवतीये? नाकाला, तोंडाला रूमाल बांधून वावरणाऱ्या दिल्लीकरांना श्‍वास घेण्यात समस्या निर्माण होत होती. अशीच परिस्थिती शहरात गुरुवारी दिवसभर पाहायला मिळाली. प्रदूषित हवेमुळे पुण्यातील वातावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत असून, पुण्यातही दिल्लीसारखी परिस्थिती उद्‌भवण्याचा धोका आहे.

👉थंडीच्या दिवसांत सर्वदूर पसरलेली धुक्‍याची चादर मनाला उत्साहित करते. निसर्गाचे एक वेगळे रूप यावेळी पाहायला मिळत असल्याने नागरिक ही प्रसन्न होतात. अशीच चादर गुरुवारी दिवसभर शहराच्या वातावरणात पसरलेली दिसून आली. मात्र, ही चादर म्हणजे हिवाळ्याच्या गुलाबी थंडीतील धुक्‍याची चादर नसून, धूर आणि धुलिकण यामुळे निर्माण झालेल्या धुरक्‍याची, प्रदूषित हवेची होती.

◼ गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे हवेचे अभिसरण होण्यास अडथळे निर्माण होत आहे. यामुळे वाहनांचा धूर आणि धुलिकणही हवेत आहे. तशीच राहत असून, वातावरणावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याचे भारतीय हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. तर हवेचे अभिसरण होत नसल्याने हवेतील पीएम 10, पीएम 2.5, नायट्रोजन ऑक्‍साईड यासाराखी प्रदूषकारी घटक वाढत असल्याने हवेचे प्रदूषण होत असल्याचे “सफर’च्या नोंदीत आढळून आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages