🚨पुणे शहरात विक्रीसाठी कर्नाटक राज्यातून आलेल्या ट्रकमध्ये साडेसहा लाख रुपये किंमतीचा २४ पोती गुटखा कोथरुड पोलिसांनी पकडला - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 10, 2019

🚨पुणे शहरात विक्रीसाठी कर्नाटक राज्यातून आलेल्या ट्रकमध्ये साडेसहा लाख रुपये किंमतीचा २४ पोती गुटखा कोथरुड पोलिसांनी पकडला


💁‍♂कर्नाटक राज्यातून पुण्यात विक्रीसाठी आलेले २४ पोती गुटखा कोथरुड पोलिसांनी पकडला. पोलिसांनी अंदाजे साडेसहा लाख रुपये किंमतीचा गुटखा व ट्रक पकडून अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे.

👉२४ पोती गुटखा पुण्यात विक्रीसाठी घेऊन आलेला ट्रकचालक षण्मुखाप्पा बसवराज यलीगार (वय 33, रा अरलीकट्टी,ता. हुबळी, जि़. धारवाड, कर्नाटक) आणि कोथरूड येथील दुकानदार महेश जसराज भाटी (वय 22, रा. सुतारदरा, गल्ली क्र 10,शिवकल्याण नगर कोथरूड) या दोघांना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

🚨कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील हे तपास पथकातील कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते. उजवी भुसारी कॉलनी येथे कर्नाटकातील एक ट्रक उभा होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची तपासणी केली असता त्यात २४ पोती विमल गुटखा आढळून आला. त्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली व आरोपी व ट्रकसह गुटखा एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

🎯सदरची कारवाई,  
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, उपनिरीक्षक संतोष पाटील, पोलीस कर्मचारी संभाजी लोखंडे, युवराज काळे, नितीन कानवडे, मनोज पवार, महेंद्र उईके, भास्कर बुचडे यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages