😱घराच्या वाटणीवरून पत्नीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 3, 2019

😱घराच्या वाटणीवरून पत्नीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या💁‍♂वारंवार भांडणे करून पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.

👉संदीप गणपत कापसे (वय 37, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी शुभांगी संदीप कापसे (वय 30) हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत संदीप यांची आई मंगला कापसे (वय 64) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात रविवारी दिनांक 1 डिसेंबर 2019 रोजी फिर्याद दिली आहे.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
2017 ते 27 जून 2019 या कालावधीत आरोपी शुभांगी पती संदीप यांच्याशी घराच्या वाटणीवरून वारंवार वाद घालत असे. तसेच शिवीगाळ करीत घटस्फोट घेण्याची धमकी देत असत. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून संदीप यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Post Bottom Ad

#

Pages