😱धक्कादायक घटना...बिबवेवाडी परिसरात पबजीच्या आहारी गेलेल्या १६ वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 4, 2019

😱धक्कादायक घटना...बिबवेवाडी परिसरात पबजीच्या आहारी गेलेल्या १६ वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या


💁‍♂आजची युवा पिढी पबजी व टिक टाॅकच्या व्यसनात अडकत चालली आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ते टोकाच पाऊल उचलायला मागे पुढे पाहत नाही. 

👉पबजीच्या आहारी गेलेल्या १६ वर्षाच्या मुलाने पुण्यामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेला मुलगा व त्याच्या आजी बिबवेवाडी परिसरात राहायचे. मुलास मोबाइलचे व्यसन लागले होते. त्याने व्यसनमुळे नववीनंतर शाळा देखील सोडली होती. पबजी गेम व टिकटॉक व्हिडीओ पाहण्यावरून आजी रागवल्यामुळे मुलाने आत्महत्या केली असल्याचे स्थानिकाचे नागरीकांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री आजी एका खोलीत झोपली असताना त्याने दुसऱ्या खोलीत मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आजी सकाळी उठल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. खोलीत मिळालेल्या मोबाइलमध्ये त्याने केलेल्या आत्महत्येचे रेकॉर्डिंग मिळाले आहे.

🚨याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोबाइलवर सतत पबजी गेम खेळण्याच्या नैराष्यातून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post Bottom Ad

#

Pages