😱 धक्कादायक घटना...कामावरून घरी येण्यास उशीर झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, December 23, 2019

😱 धक्कादायक घटना...कामावरून घरी येण्यास उशीर झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या..

😱 धक्कादायक घटना...कामावरून घरी येण्यास उशीर झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या..

मयत ह्या धुणी-भांड्याचे कामे करीत होत्या. त्यांना कामावरून येण्यास नेहमीच उशीर होत असल्याच्या कारणावरून पत्नी आणि आरोपी पती यांच्यात भांडण झाल्याने पतीने कोयत्याने वार करत पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. २३) पहाटे पिंपळे गुरव येथे घडली आहे.

शैला हनुमंत लोखंडे (वय 40) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
हनुमंत बाबुराव लोखंडे (वय 58, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) असे आरोपी पतीचे नाव असून सांगवी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
मयत शैला या धुणी-भांड्याचे कामे करीत होत्या. त्यांना कामावरून येण्यास नेहमीच उशीर होत असे. त्यावरून शैला आणि आरोपी हनुमंत यांच्यात नेहमी भांडण होत असे. सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास त्या दोघांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी संतापलेल्या आरोपीने शैला यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांचा आरडा ओरडा ऐकून वरच्या मजल्यावर राहणारा सावत्र मुलगा खाली आला. त्याने खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शैला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मुलाने त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पती याला ताब्यात घेतले आहे.
सदर घटनेचा पुढील तपास सांगवी पोलिस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages