🚨बारामतीमधूनच ठरणार कुणाच्या गळ्यात मुंबई, पुण्याची माळ पडेल, याची पोलीस वर्तुळात चर्चा - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 5, 2019

🚨बारामतीमधूनच ठरणार कुणाच्या गळ्यात मुंबई, पुण्याची माळ पडेल, याची पोलीस वर्तुळात चर्चा💁‍♂विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल, असा विश्वास अनेकांना होता. पण, निकालानंतर परिस्थिती बदलली असून आता महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले आहे. या सत्ताबदलामुळे पोलीस आयुक्तालयातीलही समीकरणे बदलत असून कुणाच्या गळ्यात मुंबई, पुण्याची माळ पडेल, याचीच चर्चा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये आहे.

👉गेली पाच वर्षे राज्यात भाजप व शिवसेना युतीचे सरकार होते. या सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक निर्माण करून अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी आवडीचे ठिकाण पदरात पाडून घेतले. यात प्रामुख्याने पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि नागपूरसारख्या ठिकाणचे महत्त्वाचे पोलीस आयुक्तपद मिळवण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या काळात प्रमुख पदे भूषवणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून अनेक कनिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेल्यांना मुंबई, पुण्याचे पोलीस आयुक्तालय मिळाले. हे सरकार पुन्हा परत येईल व फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास सर्व वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे अनेक आयपीएस अधिकारी आपापली सरकारप्रती असलेली निष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामार्गानेच पुणे, मुंबई काबीज करण्यासाठी प्रयत्न करीत होते. नागपूकरांनाही पुण्याच्या गादीवर आपला क्रमांक लागेल, असा विश्वास होता. तशी चर्चाही वरिष्ठांमध्ये होती.

🎯पण, शरद पवारांनी सत्ता समीकरण बदलवून  महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन  केले. या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करीत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निष्ठा बाळगणाऱ्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे गणितच बिघडले असून आता नव्याने पोलीस आयुक्तालयांचे समीकरण ठरवले जात आहेत. त्यासाठी लाचलुचपत विभागापासून ते नागपूरकरापर्यंत सर्वजण नवीन सरकारसोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही वरिष्ठ आयपीएस अधिकारी मातोश्रीवरही दिसून येत असल्याची माहिती आहे. परंतु मुंबई, पुण्याची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे बारामतीमधूनच ठरणार असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.

🚨या अधिकाऱ्यांच्या नावांची जोरदार चर्चा
राज्यात सर्वाधिक चर्चा मुंबई पोलीस आयुक्तपदाची होत असते. पोलीस महासंचालक पदापेक्षा मुंबई पोलीस आयुक्तपदाला अधिक वलय असल्याने प्रत्येक अधिकाऱ्याची हे पद मिळवण्याची सुप्त इच्छा असते. संजय बर्वे यांना केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता लवकरच ते सेवानिवृत्त होणार असून मुंबईसाठी इच्छुकांमध्ये परमबिर सिंग, बिपीन बिहारी, हेमंत नगराळे, संजय पांडे, रजनिश सेठ, रश्मी शुक्ला, डॉ. के. व्यंकटेशम यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. नवीन सरकारच्या काळात ही चर्चित नावे मागे पडून वेगळेच नाव समोर येऊ शकते. पुण्यासाठी डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि नागपूरसाठी देवेन भारती यांचेही नाव चर्चेत आहे.

Post Bottom Ad

#

Pages