🚨पार्किंग केलेल्या दुचाकी आणि नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या गँगला वानवडी पोलिसांनी सापळा रचून केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 5, 2019

🚨पार्किंग केलेल्या दुचाकी आणि नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या गँगला वानवडी पोलिसांनी सापळा रचून केली अटक💁‍♂पुणे शहरातील विविध भागात पार्किंग केलेल्या दुचाकी आणि नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या गँगला वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून वानवडी, हडपसर, कोंढवा, भारती विद्यपीठ आणि ग्रामीण परिसरातील गुन्हे 17 उघडकीस आणले आहेत. 13 दुचाकी व 45 मोबाईल असा 7 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

👉अजितनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24, कृष्णा नगर मोहम्मद वाडी), तुकाराम मनोहर चोपडे (वय 19 रा. कृष्णा नगर मोहम्मदवाडी) रोहित रामप्रताप वर्मा (वय 19, रा. कृष्णानगर मोहम्मदवाडी) आणि पवित्र सिंग गब्बर सिंग टाक (वय 19. रामटेकडी हडपसर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शहरात दुचाकी आणि एकट्या फिरणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी परिमंडळ पाचचे उपायुक्त सुहास बावचे यांनी हद्दीत गस्त वाढवून चोरट्यांचा माग काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी पथक चोरट्यांचा माहिती काढत होते. यादरम्यान पोलीस नाईक संभाजी देविकर व पोलीस शिपाई नासेर देशमुख यांना या गँगची बातमी दाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनील कलगुटकर  यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पो. नि. गुन्हे सलीम चाऊस पथकातील उपनिरीक्षक अंकुश डोंबळे, सहायक फौजदार रमेश भोसले, पो हवा राजु रासगे,  पो ना योगेश गायकवाड , संभाजी देवीकर, पो शि नवनाथ खताळ, महेश कांबळे, नासेर देशमुख, सुधीर सोनावणे, अनुप सांगले, प्रतीक लाहीगुडे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून चौघांना ताब्यात घेत त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. वानवडी पोलिसांनी अटक केली असता चौघांनाकडून वानवडी, हडपसर, कोंढवा, भारती विद्यपीठ आणि ग्रामीण परिसरातील गुन्हे 17 उघडकीस आणले आहेत. 13 दुचाकी व 45 मोबाईल असा 7 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Post Bottom Ad

#

Pages