😱 धक्कादायक..तरुणीच्या ब्लॅकमेलला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या..तरुणीसह एका पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 18, 2019

😱 धक्कादायक..तरुणीच्या ब्लॅकमेलला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या..तरुणीसह एका पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल


😱 धक्कादायक..तरुणीच्या ब्लॅकमेलला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या..तरुणीसह एका पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल

बीड शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी संध्याकाळी 6च्या सुमारास शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांना सुसाईट नोट सापडली आहे.

ब्लॅकमेलला वैतागून आत्महत्या करणारे दिलीप प्रकाश केंद्रे पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
एक वर्षापूर्वी जळगावातून पोलीस कर्मचारी दिलीप केंद्रे यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बदली झाली होती. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील धांडेनगर परिसरामध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मागच्या 6 महिन्यांपासून दिलीप केंद्रे अस्वस्थ होते. आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमधून धक्कादायक बाबा उघड झाली आहे. एका तरुणीच्या ब्लॅकमेलला कंटाळून दिलीप केंद्रे यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रे यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्या तरुणीसह जळगाव येथील एका पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रे यांचं मूळ गाव धारूर तालुक्यातील आडस परिसरातील धावडी आहे. सतत्याने होत असणाऱ्या ब्लॅकमेलला कंटाळून केंद्रे यांनी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. जळगाव येथील एक तरुणी ब्लॅकमेल करत होती, त्यातूनच हा सगळा प्रकार घडला असल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान या प्रकरणी वरिष्ठांकडे दिलीप केंद्रे यांनी याबाबत तक्रार केली नव्हती का? ब्लॅकमेल करण्याचं कारण नेमकं काय कारण होतं? याबात सध्या पोलिसांकड़ून तपास सुरू आहे.

Post Bottom Ad

#

Pages