😱मद्यप्राशन केलेल्या कारचालकाने भरधाव कार दुचाकीला पाठीमागून धडकवल्याने तरुणीचा मृत्यू... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 13, 2019

😱मद्यप्राशन केलेल्या कारचालकाने भरधाव कार दुचाकीला पाठीमागून धडकवल्याने तरुणीचा मृत्यू...


😱मद्यप्राशन केलेल्या कारचालकाने भरधाव कार दुचाकीला पाठीमागून धडकवल्याने तरुणीचा मृत्यू...
पुणे येथील खराडी रस्तावर गुरुवारी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला मद्यप्राशन केलेल्या आयटी अभियंता कारचालकाने भरधाव कार पाठीमागून धडकवली. त्यामध्ये तरुणी स्कूटीवरून पडत रस्त्यावर घसरत गेली. दरम्यान, अपघातानंतर स्कूटीतील पेट्रोल सांडून गाडीने पेट घेतल्यामुळे तरुणीला भाजल्याने तिच्या डोक्‍याला मार लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
श्रध्दा मधुकर बांगर (वय-22, रा. चंदननगर) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक मनीष बळीराम चौधरी (वय 37, रा.पाषण रोड) याला पोलिसांनी अटक केली आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार,
मनीष चौधरी हा आयटी अभियंता असून एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. गुरुवारी रात्री श्रध्दा ही खराडी येथील सिटी विस्टासमोरून जात असताना तिच्या स्कूटी पेप्ट गाडीला नगर रस्त्याच्या दिशेने येत कारचालक मनिष चौधरी याने त्याची भरधाव कार पाठीमागून धडकवली. त्यामध्ये श्रध्दा स्कूटीवरून पडत रस्त्यावर घसरत गेली. दरम्यान, अपघातानंतर स्कूटीतील पेट्रोल सांडून गाडीने पेट घेतला. अपघातामुळे श्रध्दा जखमी होऊन तिच्या डोक्‍याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी कारचालकाला घेतले ताब्यात :-
अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल होताच कारचालकाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झालेने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटणेचा पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहे.

Post Bottom Ad

#

Pages