📶आजपासून जिओचे नवे प्लॅन काय आहेत ! ! जाणून घेऊयात.... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 7, 2019

📶आजपासून जिओचे नवे प्लॅन काय आहेत ! ! जाणून घेऊयात....


💁‍♂दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या रिलायंस जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तिन्ही कंपन्यांनी दरवाढ केली आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांची टॅरिफ दरवाढ तीन डिसेंबरपासून लागू झाल्यानंतर आजपासून रिलायंस जिओचीही दरवाढ लागू होत आहेत. आजपासून जिओचे नवे प्लॅन लागू झाले आहेत. जिओ टीव्हीवर 600 हून अधिक चैनल पाहायला मिळणार आहेत. जिओ सिनेमावर 10,000 प्लस अधिक कार्यक्रम पाहता येणार आहेत, तसेच क्लाऊडवर 5 जीबी स्टोरेज मोफत मिळणार आहे.

📶जिओचे सर्व प्लॅन पुढील प्रमाणे –
199 रुपये - दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जिओ अ‍ॅपचं सब्स्क्रिप्शन मोफत, 28 दिवसांची वैधता.

249 रुपये - दररोज 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जिओ अ‍ॅपचं सब्स्क्रिप्शन मोफत, 28 दिवसांची वैधता.

349 रुपये - दररोज 3 जीबी डेटा, अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत, 28 दिवसांची वैधता.

399 रुपये - दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत, 56 दिवसांची वैधता.

444 रुपये - दररोज 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप  सब्स्क्रिप्शन मोफत, 56 दिवसांची वैधता.

555 रुपये - दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत, 84 दिवसांची वैधता.

599 रुपये - दररोज 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत, 84 दिवसांची वैधता.

2,199 रुपये - दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत, 365 दिवसांची वैधता.

Post Bottom Ad

#

Pages