👌१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांवर नापासचा शेरा बसणार नाही - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 5, 2019

👌१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांवर नापासचा शेरा बसणार नाही


💁‍♂दहावी आणि बारावीत शिक्षण घेण्याचा काळ म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पाँईंट मानला जातो. कारण दहावी नंतर काय करायचे किंवा कोणत्या क्षेत्रात पुढचे शिक्षण घ्यायचे? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. दहावीप्रमाणे बारावीनंतरही तसाच प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांना जास्त महत्त्व दिले जाते. मात्र, बऱ्याचदा दहावी-बारावीत अनुतीर्ण झाल्यावर विद्यार्थी खचून जातात. ते प्रचंड तणावात जातात. याच तणावातून अनेकांनी आत्महत्या देखील केल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालावर ‘नापास’ असा शेरा लागणार नाही. नापास या शेरा ऐवजी गुणपत्रिकेवर ‘कौशल्य विकासास पात्र’ असे नमूद करण्यात येणार आहे.

👉कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत योजना
दाहावीच्या गुणपत्रिकेवर ‘नापास’, ‘अनुत्तीर्ण’ आणि ‘फेल’ हे तीन शब्द तीन वर्षांपूर्वीच हद्दपार करण्यात आली आहेत. त्याएवजी ‘कौशल्य विकासास पात्र’ असे नमूद करण्यात येणार आहे. आता हा शेरा बारावीच्या गुणपत्रिकेवर देखील असणार आहे. अशा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचा राज्यसरकारचा मानस आहे.

🎯तीन पेक्षा जास्त विषयांत उत्तीर्ण न होऊ शकणाऱ्या विद्यार्थांसाठी योजना
दहावी आणि बारावीत तीन किंवा तीन पेक्षा जास्त विषयांमध्ये उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा दिली जाणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages