😱मुंबई नेहरू नगर पोलीस वसाहतीत सर्पदंशाने पोलीस शिपायाचा मृत्यू - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 10, 2019

😱मुंबई नेहरू नगर पोलीस वसाहतीत सर्पदंशाने पोलीस शिपायाचा मृत्यू


💁‍♂कुर्ला येथील नेहरू नगर पोलीस वसाहतीत सुनील तुकाराम भगत (३५) या पोलीस शिपायाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.
👉सुनील यांचा मृत्यू हा सर्प दंशानेच झाल्याचा अंदाज नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी वर्तविला आहे. मात्र,शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.
🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सुनील पुणे पोलिसात कार्यरत होते, तर त्यांची पत्नी समृद्धी भगत या देवनार पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कर्तव्यावर आहेत. सुनील आणि पत्नी समृद्धी हे नेहरू नगर येथील पोलीस वसाहतीत इमारत क्रमांक ११० मधील ३६८४ या घरात राहतात. रविवारी रात्री सुनील यांना अचानक रात्री साडेतीन वाजताच्या दरम्यान अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागल्याने त्यांनी पत्नीला उठवले आणि पाणी आणण्यास सांगितले. किचनमध्ये जात असताना पत्नीस नाग(साप) आढळून आला. त्याच वेळी सुनील यांची तब्येत पूर्णपणे खालावली. शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नी समृद्धी यांनी त्यांना सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारास दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.सुनील यांना श्लोक नावाचा एक दोन वर्षांचा मुलगा आहे.
 
🐍पोलिसांनी सर्पमित्र सुनील कदम यांना याची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन साडेतीन फूट लांब अतिशय विषारी नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले.

Post Bottom Ad

#

Pages