😱आश्चर्याची घटना...चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीनच चोरून नेले.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 15, 2019

😱आश्चर्याची घटना...चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीनच चोरून नेले..

😱आश्चर्याची घटना...चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीनच चोरून नेले..

फॉर्च्युनर कार मधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशिनच घेऊन गेल्याची घटना आज, रविवार दिनांक 15 डिसेंबर 2019 रोजी पहाटे 2:00 वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली आहे. या घटनेच्या वेळेस गस्तीवर असलेल्या पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला असता पोलिसांच्या अंगावर गाडी घालत चोरट्यांनी पलायन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,
चाकण जवळ म्हाळुंगे येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. रविवारी पहाटे 2:00 वाचण्याच्या सुमारास फॉर्च्युनर कार मधून आलेल्या चोरट्यांनी दोरखंडाच्या मदतीने एटीएम मशीन घेऊन गेले. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला असता पोलिसांच्या अंगावर चोरट्यांनी गाडी घालत पलायन केले आहे. चोरट्याने चोरून नेलेल्या एटीएम मशीनमध्ये किती रोकड होती हे समजू शकले नाही. सदर घटनेप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलिस व गुन्हे शाखा चोरट्यांचा शोध घेत आहे.

एटीएम मशिनच पळविण्याच्या घटना पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत असल्याने पोलीस आयुक्तांनी एटीएम मशीनच्या सुरक्षेबाबत विशेष गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे पोलीस गस्त घालत असल्याचे दिसून येत आहे.

Post Bottom Ad

#

Pages