😱धक्कादायक बाब...महिलांच्या सुरक्षेसाठी देण्यात येणाऱ्या निर्भय निधीचा महाराष्ट्रात वापर शून्य - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 8, 2019

😱धक्कादायक बाब...महिलांच्या सुरक्षेसाठी देण्यात येणाऱ्या निर्भय निधीचा महाराष्ट्रात वापर शून्य💁‍♂देशातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असतानाही महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या निर्भय निधीचा महाराष्ट्रात शून्य वापर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निर्भया निधी देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात या निधीचा शून्य वापर झाला असून इतर राज्यांना देण्यात आलेल्याया निधीपैकी 90 टक्के निधीचा वापरच झालेलाच नसल्याचे निदर्शनास आले आहे.

👉देशात विविध राज्यांत तरुणींवर बलात्कार, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर येत असताना या निधीचा वापर महिलांच्या सुरक्षेसाठी न होणे हे धक्कादायक आहे. हैदराबादमधील तेलंगाना आणि उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बलात्काराच्या घटना समोर आल्यानंतर निर्भया निधीचा वापर राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेकरीता करतच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या भीषण बलात्कार प्रकरणानंतर या निधीची सुरवात करण्यात आली होती.

📑महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलल्या अहवालात देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी अवघ्या चार राज्यांनी सर्वाधिक निधी वापरला आहे. तर, 15 टक्क्यांपेक्षा अधिक निधी 18 राज्यांनी वापरला आहे. 29 नोव्हेंबरला याबाबत लोकसभेत माहिती दिलेली आहे.

😱दरम्यान, निर्भया निधी वापरण्याच्या यादीत महाराष्ट्र सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१७ मध्ये दिलेल्या अहवालात महाराष्ट्र हे राज्य महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. तरीही महाराष्ट्रातील सरकारने या निधीचा वापर केलेला दिसत नाही.

राज्यातील निर्भया निधी वापराची टक्केवारी
▪ उत्तराखंड (५० टक्के)
▪ मिझोराम (५० टक्के)
▪ छत्तीसगड (43 टक्के),
▪ नागालँड (39 टक्के)
▪ हरियाना (32 टक्के)
▪ कर्नाटक (६ टक्के)
▪ ओडिशा (६ टक्के )
▪ तेलंगणामध्ये (6 टक्के)
▪ उत्तर प्रदेशात (२१ टक्के)
▪ महाराष्ट्र ( ० टक्के )

Post Bottom Ad

#

Pages