😱पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपीनं थेट पोलीस स्टेशन गाठत गुन्ह्याची दिली कबुली - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 6, 2019

😱पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपीनं थेट पोलीस स्टेशन गाठत गुन्ह्याची दिली कबुली💁‍♂दुसऱ्या पत्नीवरून दोघांमध्ये सततच्या वादातून पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपीनं थेट पोलीस स्टेशन गाठत गुन्ह्याची कबुली दिल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. या प्रकारानंतर चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

👉बानू हसनसहाब नदाफ (वय-३४) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर हसनसहाब (वय-४१) असे आरोपी पतीचे नाव आहे. हसनसहाबने काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह केला होता. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता. यातूनच खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शुक्रवारी सकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास हसनसहाब आणि पत्नी बानू यांच्यात राहत्या घरात दुसऱ्या पत्नी वरून वाद झाला. यातून हसनसहाबने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी हसनसहाब याने थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, आरोपी ने २०११ ला दुसरा विवाह केला होता. यावरून पहिल्या पत्नी बरोबर अनेकदा वाद झाले होते. पहिल्या पत्नीचे तीन मुले आहेत. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Post Bottom Ad

#

Pages