🚨पोलीस असल्याची बतावणी करून एसटी बसमधील एका प्रवाशाचे अपहरण करणाऱ्या भामटय़ांचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक करत अपहृत व्यक्तीची केली सुटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 8, 2019

🚨पोलीस असल्याची बतावणी करून एसटी बसमधील एका प्रवाशाचे अपहरण करणाऱ्या भामटय़ांचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक करत अपहृत व्यक्तीची केली सुटक💁‍♂बलात्काराच्या गुन्ह्य़ातील आरोपी एसटी बसमधून प्रवास करीत असल्याची थाप मारून आणि मी स्वत: पोलीस असल्याची बतावणी करून एसटी बसमधील एका प्रवाशाचे अपहरण करणाऱ्या भामटय़ांचा शोध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी लावला असून त्यांच्या ताब्यातून अपहृत व्यक्तीची सुटकाही करण्यात आली आहे. सुतावरून स्वर्ग गाठत या गुन्ह्य़ाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

👉अपहरणकर्ता शेषलाल राठोड (रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) याने आर्थिक व्यवहारातून हा अपहरणाचा प्रकार घडवल्याचे निष्पन्न झाले आहे. शेषलाल याचा साथीदार राहुल अर्जुन राठोड (रा. मुळेगाव तांडा) यास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून अपहृत मुन्ना खुने याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. प्रमुख सूत्रधार शेषलाल राठोड व इतर साथीदारांचा शोध सोलापूर ग्रामीण पोलिस घेत आहे.

🚨सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार,
दोन दिवसांपूर्वी हैदराबाद येथून पुण्याकडे जाणारी शिवशाही बस (एमएच १४ -जीडी ९६१४) सोलापूरच्या अलीकडे बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) गावच्या शिवारात पुलाजवळ थांबली असताना स्वत: ला पोलीस असल्याचे सांगत दोघे-तिघे तरूण बसमध्ये चढले आणि या बसमधून बलात्काराच्या गुन्ह्य़ात आरोपी असलेला आरोपी प्रवास करीत आहे. त्याला ताब्यात घ्यायचे आहे, अशी सूचना बस वाहकाला दिली. नंतर त्या कथित पोलिसांनी बसमधील एका प्रवाशाला बळजबरीने ताब्यात घेतले व त्याला बसखाली उतरवून नेले. या घटनेविषयी शंका आल्याने बसवाहक प्रवीण जाधव (पिंपरी-चिंचवड आगार, पुणे) यांनी याबाबतची माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास कळविली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पाठविले. अपहृत प्रवासी व्यक्ती उमरगा (जि. उस्मानाबाद) येथून बसमध्ये बसला होता. पोलिसांनी उमरगा एसटी बसस्थानक परिसरात सीसीटीव्हीचे फुटेजची तपासणी केली असता. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये अपहृत प्रवासी व्यक्ती डस्टर कंपनीच्या मोटारीतून उमरगा एसटी बसस्थानक आवारात येऊन बसमध्ये बसल्याचे दिसून आले. अपहरण कर्त्याने प्रवास केलेल्या डस्टर मोटारीच्या क्रमांकावरून ही मोटार मुंबईतील पासिंग असल्याचे स्पष्ट झाले. त्या माध्यमातून मोटारमालकाशी संपर्क साधून उमरगा येथे ती डस्टर मोटार वापरणाऱ्या संबंधित व्यक्तीची माहिती पोलिसांनी मिळविली. रोहन ऊर्फ मुन्ना खुने (रा.उस्मानाबाद) असे त्या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांना समजले परंतु त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या गुह्य़ाची नोंद झाली. तथापि, यातील अपहरणकर्ता रोहित ऊर्फ मुन्ना खुने याच्या कुटुंबीयांकडून व मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे अपहरणकर्ता शेषलाल राठोड (रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) याने घडवून आणल्याची माहिती निष्पन्न झाली. आर्थिक व्यवहारातून हा अपहरणाचा प्रकार घडल्याची बाब समोर आली. शेषलाल याचा साथीदार राहुल अर्जुन राठोड (रा. मुळेगाव तांडा) यास अटक करण्यात आली असून त्याच्याच ताब्यातून अपहृत मुन्ना खुने याची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. प्रमुख सूत्रधार शेषलाल राठोड व इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

🚨सदरची कारवाई,
पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक देवडे, उपनिरीक्षक दीपक दळवी, सहायक फौजदार नासीर सैफन शेख, हवालदार सुभाष पवार, सय्यद आदींनी यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages