🎯 कर्नाटकच्या विजयाची संधी साधत मोदींनी आणि फडणवीसांनी शिवसेनेवर साधला निशाणा - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, December 9, 2019

🎯 कर्नाटकच्या विजयाची संधी साधत मोदींनी आणि फडणवीसांनी शिवसेनेवर साधला निशाणा


💁‍♂संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता धडा शिकवते, असे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला टोला लगावला आहे.
👉आज कर्नाटक मधील पोटनिवडणुकांचा निकाल लागला. यात भाजपचा दमदार विजय झाला आहे. 15 जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने 15 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे. कर्नाटकच्या विजयाची संधी साधत मोदींनी आणि फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
🗣फडणवीस म्हणाले की, ‘जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात,जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात,त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते,याचे उदाहरण आज कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे.जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहे.
🗣कर्नाटक निकालावरूनचं पंतप्रधान मोदींनी शिवसेनेला टोला लाग्वाला. ‘कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे की, जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात,’ असं म्हणत मोदींनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages