😱बलात्काराचे आणि अपहरणाचे आरोप असलेला स्वामी नित्यानंद देशातून परांगदा होऊन त्याने केला एक देश स्थापन - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 4, 2019

😱बलात्काराचे आणि अपहरणाचे आरोप असलेला स्वामी नित्यानंद देशातून परांगदा होऊन त्याने केला एक देश स्थापन💁‍♂वादग्रस्त स्वामी नित्यानंद याच्यावर बलात्काराचे आणि अपहरणाचे आरोप आहेत. हा वादग्रस्त बाबा देशातून परांगदा झाला असून त्याने एक देश स्थापन केला आहे. कैलासा असे या देशाचे नाव आहे.


👉इक्वाडोर या भागात नित्यानंदने एक बेट विकत घेतले असून तिथे कैलासा नावाचा देश स्थापन केला आहे. या देशाची वेबसाईट लॉन्च केली असून  याबात माहिती दिली आहे.कैलासा या देशाला कुठलीच सीमा नसणार आहे. ज्या हिंदुना जगातून हाकलवून्लावले आहे अशा लोकांनी कैलासा हा देश स्थापन केला आहे. या देशचा स्वतःचा पासपोर्ट असून नित्यानंदने त्याचा एक फोटोही पोस्ट केला होता. या देशात गुरुकुल शिक्षण पद्धत असणार आहे. तसेच एका मंदिरावर आधारित तिसर्‍या डो”ळ्याच्या मागे विज्ञान, योग आणि ध्यानधारणा असणाअर आहे. एवढेच नव्हे तर या देशात आरोग्य सुविध, शिक्षण, जेवण सर्व मोफत असणार आहे.

◼ नित्यानंदवर बलात्कार, लैंगिक शोषण आणि अपहरणाचे आरोप आहेत. त्यामुळे नित्यानंदने तुरुंगाची वारीही केली आहे. २०१८ मध्ये नित्यानंदला जामीन मिळाला होता. त्याचाच गैरफायदा घेत नित्यानंद परागंदा झाला आहे.

Post Bottom Ad

#

Pages