🚨आंध्रप्रदेशात खुनकरून पुण्यातील खडकीत राहणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने केले जेरबंद - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 6, 2019

🚨आंध्रप्रदेशात खुनकरून पुण्यातील खडकीत राहणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने केले जेरबंद💁‍♂रागाच्या भरात आंध्रात एका चिकन सेंटर दुकानदाराचा खूनकरुन पुण्यातील खडकीत राहणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने जेरबंद केले.

👉अमीर मुखीमुद्दीन अली (वय २०, रा. शहापूर, उत्तरप्रदेश, मूळ- कडाप्पा, आंध्रप्रदेश ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. इंतियाज शेख (रा. आंध्रप्रदेश ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

◼ सतत अपमानित केल्याचा राग आल्यामुळे तीन दिवसांपुर्वी अमीरने त्याचा भाउ आणि चुलत्याच्या मदतीने  इंतियाजचा खून केला. त्यानंतर तो पळून खडकीत नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला. त्यानुसार आंध्रप्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी खडकीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सचिन जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अमीरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इंतियाजचा खून केल्याची कबुली दिली.

🚨सदरची कामगिरी, 
पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, सचिन जाधव, तुषार माळवदकर, इम्रान शेख, गजानन सोनुने, सुधाकर माने, योगेश जगताप, सुभाष पिंगळे, उमेश काटे, तुषार खटके, विजेसिंग वसावे यांनी केली.

Post Bottom Ad

#

Pages