😱पुणे महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांतील डॉक्‍टर रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेण्याचा सल्ला देत असल्याचे डझनभर प्रकार उघडकीस - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 5, 2019

😱पुणे महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांतील डॉक्‍टर रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेण्याचा सल्ला देत असल्याचे डझनभर प्रकार उघडकीस💁‍♂आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना उपचारासह त्यांना मोफत औषधे देण्यासाठी महापालिका वर्षाला दीडशे कोटी रुपये खर्च करीत असल्याचा हिशेब दाखवते. मात्र, याच महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांतील डॉक्‍टर रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेण्याचा सल्ला देत असल्याचे डझनभर प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पाहिला. 

👉दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतून आरोग्य खात्यातील गोंधळ पुढे आला आहे. 
आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी महापालिकेतर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत वर्षाला साधारणपणे ३६ कोटी रुपयांची औषधे खरेदी केली जातात. महापालिकेच्या स्टोअरसह प्रत्येक रुग्णालये आणि दवाखान्यात ही औषधे उपलब्ध असतात; परंतु बहुतांशी डॉक्‍टर ही औषधे उपलब्ध नसल्याचे सांगून बाहेरील औषधे विकत घेण्यास भाग पाडत असल्याच्या तक्रारी आहेत. समितीच्या सर्व सदस्यांनी कमला नेहरू रुग्णालयासह काही दवाखान्यांची बुधवारी पाहणी केली. त्या वेळी रुग्णांना औषधे दिली जात नसल्याचे दिसून आले. आरती कोंढरे, मनीषा लडकत, स्वप्नाली सायकर, रत्नप्रभा जगताप, डॉ. श्रद्धा प्रभुणे आदी उपस्थित होत्या.

Post Bottom Ad

#

Pages