🚨पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा..२६ जण ताब्यात,६१ हजार ५८० रुपये जप्ता - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 14, 2019

🚨पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा..२६ जण ताब्यात,६१ हजार ५८० रुपये जप्ता

🚨पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा..२६ जण ताब्यात,६१ हजार ५८० रुपये जप्त

पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सदाशिव पेठेतील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डावर शुक्रवारी रात्री छापा घालत जुगार खेळणाऱ्या २६ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ६१ हजार ५८० रुपये व ९०० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बेकायदा धंदे करणाऱ्यांना धंदे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने बेकायदा धंद्यावर कारवाई करत असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी जवळ गिरीधर पारिजात या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पत्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके व पथकातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री येथे छापा घालत जुगार खेळणाऱ्या २६ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ६१ हजार ५८० रुपये व ९०० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या सर्व २६ जणांना अटक करून जुगार अड्ड्याच्या मालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages