🚨पोलिस महासंचालकांच्या हिंदुस्थानी शिखर परिषदेचे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी उद्धाटन - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 7, 2019

🚨पोलिस महासंचालकांच्या हिंदुस्थानी शिखर परिषदेचे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी उद्धाटन💁‍♂पोलिस महासंचालकांच्या हिंदुस्थानी शिखर परिषदेचे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी उद्धाटन झाले. बाणेर परिसरातील आयसर (हिंदुस्थानी विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संशोधन संस्थेच्या आवारात ही परिषद होत आहे. याप्रसंगी पोलिस महासंचालक यांच्यासह गुप्तचर विभागाचे अतिवरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुढील दोन दिवस ही परिषद सुरू असणार आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व अधिकार्‍यांना संबोधित करणार असून, देशांतर्गत सुक्षेसह पोलिसिंगवर देखील चर्चा होणार आहे.


👉गुप्तचर विभागात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांचा त्यांच्या कुटूंबियासमवेत शहांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच देशामधील पोलिस क्षेत्रात उत्तम काम करणार्‍या १० पोलिस ठाण्यांना गौरविण्यात आले. या परिषदेत एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्याकीय आणि शास्त्रीय तपास असून तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशाअंतर्गत सुरक्षेवर परिषदेत चर्चा केली जाणार आहे.

🎯देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस महासंचालकांची परिषद अतिशय महत्वाची मानली जात असून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह 180 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी परिषदेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, शहा यांचे दुपारी लोहगाव येथील हवाई दलाच्या तळावर आगमन झाले.

Post Bottom Ad

#

Pages