🏥नव्या तंत्रज्ञानाने शवविच्छेदन करण्यासाठी आता शरीराची चिरफाड करण्याची गरज नाही - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 4, 2019

🏥नव्या तंत्रज्ञानाने शवविच्छेदन करण्यासाठी आता शरीराची चिरफाड करण्याची गरज नाही💁‍♂शवविच्छेदन करण्यासाठी आता शरीराची चिरफाड करण्याची गरज नसेल, असे नवे तंत्र विकसित करण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यांत या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, अशी माहिती मंगळवारी राज्यसभेत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली.

👉दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या दोन संस्था शवविच्छेदनाच्या नव्या तंत्रावर एकत्रित काम करीत आहेत. आग्नेय आशिया प्रांतात व्हर्च्युअल ऑटोप्सी सुरू करणारा हिंदुस्थान हा पहिला देश असेल, असे हर्ष वर्धन यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शवविच्छेदनाची पारंपरिक पद्धत अस्वस्थ करते. त्यामुळे मृत शरीराचे सन्मानपूर्वक विच्छेदन करण्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून हे तंत्र विकसित केल्याचे त्यांनी सांगितले.

🏥अर्ध्या तासात मिळणार अहवाल
नव्या तंत्रज्ञानाने होणार्‍या शवविच्छेनाचे सर्व रेकॉर्ड डिजिटली संग्रहित केले जाणार आहे. सर्वसाधारण पद्धतीने होणार्‍या शवविच्छेदनासाठी  अडीच तास लागतात. मात्र नव्या पद्धतीत फक्त 30 मिनिटांचा अवधी लागेल. आयसीएमआरने या तंत्रासाठी एम्सला पाच कोटी रुपये दिले आहेत. नवे तंत्रज्ञान सुरुवातीला दिल्लीतील एम्समध्ये लागू केले जाईल. त्यानंतर हळूहळू देशातील इतर रुग्णालयातही लागू होईल. सध्या हे तंत्रज्ञान जर्मनी, नॉर्वे, इस्राईल, स्वीडन, ब्रिटेन आणि हाँगकाँगमध्ये वापरले जात आहे.

Post Bottom Ad

#

Pages