😱टीसीएस कंपनीत कर्मचाऱ्याने केली आत्महत्या - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 4, 2019

😱टीसीएस कंपनीत कर्मचाऱ्याने केली आत्महत्या💁‍♂हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये टीसीएस कंपनीत कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी ६ वाडण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

👉हडपसर येथे राहणारे कपिल गणपत विटकर (३९), असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते रिसेप्शनिस्ट असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, नातेवाईकांनी मात्र, कपिल यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस देखील त्या दिशेने तपास करत आहेत. घटनास्थळी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी आणि इतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
काही दिवसांपासून कपिल हे सुट्टीवर होते. कपिल यांचे तिसऱ्या मजल्यावर ऑफिस असताना त्यांनी सहाव्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या गळ्याभोवती प्लास्टिक लॉक टॅग गुंडाळलेला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ते गेल्या काही दिवसांपासून पाठीच्या कण्याच्या दुखण्याने हैराण होते, असे ही पोलिसांनी सांगितले आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. कपिल यांनी सहाव्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली जिथे सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार हिंजवडी पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages