📣पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेस पक्षाला आव्हान..हिंमत असेल तर पाकिस्तानच्या नागरिकांना नागरिकता देणार अशी घोषणा करा ! - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 17, 2019

📣पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेस पक्षाला आव्हान..हिंमत असेल तर पाकिस्तानच्या नागरिकांना नागरिकता देणार अशी घोषणा करा !📣पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेस पक्षाला आव्हान..हिंमत असेल तर पाकिस्तानच्या नागरिकांना नागरिकता देणार अशी घोषणा करा ! 
काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. महाराष्ट्राचीही या कायद्यासंदर्भात संदिग्ध भूमिका आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये या कायद्याविरुद्ध मोठं आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनाची धग देशभरात जाणवत असून हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यांना टोला लगावलाय. तसेच, काँग्रेसला आव्हानही दिलंय.
नरेंद्र मोदींनी झारखंडमधील बरहैत येथील सभेला संबोधित करताना, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यावर निशाणा साधला. काँग्रेस केवळ आपलं राजकारण करण्यासाठी या कायद्याला विरोध करत आहे. नागरिकता सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष अफवा पसरवत आहेत, हिंसाचार घडवत आहेत. या कायद्यामुळे हिंदु-मुस्लीम-शिख-ईसाई, देशातील एकाही नागरिकाच्या नागरिकत्वास धोका होणार नाही, असे मोदींनी सांगितले. तसेच, मी काँग्रेस पक्षाला आव्हान देतो की, हिंमत असेल, पाकिस्तानच्या नागरिकांना नागरिकता देणार अशी घोषणा काँग्रेसने करावी, असे मोदींनी म्हटले.

Post Bottom Ad

#

Pages