😱केटरिंगचे सामान घेऊन जाणाऱ्या गाडीच्या वाहनचालकचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बिबवेवाडीत अपघात - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 8, 2019

😱केटरिंगचे सामान घेऊन जाणाऱ्या गाडीच्या वाहनचालकचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बिबवेवाडीत अपघात💁‍♂लग्नाच्या लग्न सराईची लगीन घाई असल्याने केटरिंगचा व्यवसाय तेजीत आहे. ग्राहकांना उत्तमोत्तम सर्विस देण्यात कटिंगवाले मग्न आहेत. लग्न सराईचे काम करण्यासाठी जात असतांना शनिवारी सकाळी 6:30 वा. सुमारास केटरिंगचे सामान घेऊन जाणाऱ्या गाडीच्या वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बिबवेवाडी येथे अपघात झाला. या अपघातात 6 जण किरकोळ जखमी झाले. या घटनेप्रकरणी बिबवेवाडी पोलीस नाईक प्रदीप रासकर यांनी फिर्याद दिली आहे.

👉 ऐश्वर्या केटरर्सची पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप चारचाकी गाडीचा वाहन चालक जितेंद्रकुमार बाबुलालजी जाठ (वय 30, रा. खडीमशीन चौक,कोंढवा बुद्रुक,पुणे, मुळगाव राजस्थान) याचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने स्वामी विवेकानंद रोड,टी.व्ही.एस शोरूम जवळ,बिबवेवाडी याठिकाणी अपघात झाला.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
ऐश्वर्या केटरर्सची पांढऱ्या रंगाची महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक - एम.एच -12- ए.झेड - 0553 या चारचाकी गाडीचा वाहनचालक जितेंद्रकुमार बाबुलालजी जाठ (वय 30, रा.खडीमशीन चौक, कोंढवा बुद्रुक, पुणे) हा केटरिंगचे काम करण्यासाठी 6 कामगार व केटरिंगचे सामान घेऊन कोंढवा बुद्रुक येथून सुजय गार्डन,स्वारगेट येथे जात असतांना शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2019 रोजी सकाळी  6:30  वाजण्याच्या सुमारास स्वामी विवेकानंद रोड,टी.व्ही.एस शोरूम जवळ, बिबवेवाडी याठिकाणी गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने रोडच्या बाजूला असलेल्या पीएमपीएल बस स्टॉपला तोडून विजेच्या खांबाचे नुसकान करत फुटपाथवरील मजुरांच्या झोपड्यांना धडक देत झाडावर आधळून गाडी पलटी झाली. या अपघातात 6 जण किरकोळ जखमी झाले असून जखमींनवर राव हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
या अपघाताच्या घटनेची बिबवेवाडी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
याघटने प्रकरणी बिबवेवाडी पोलीस नाईक प्रदीप रासकर यांनी फिर्याद दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.

🗣 फुटपाथवर राहात असलेला S & J Buildcon pvt.Ltd.Pune कंपनीचे मजूर जीवनलाल यादव यांनी सांगितले की, सकाळची वेळ असल्याने आम्ही गाढ झोपेत होतो. त्यावेळेस वाहन चालकाचे नियंत्रण सुटलेल्या गाडीची आमच्या झोपडीला धडक बसून झोपडीचा पत्रा व झोपडीतील सामान मी व माझी पत्नी आमच्या दोघांच्या अंगावर पडले. सामान व पत्रे पडल्याने माझी पत्नी किरकोळ जखमी झाली आम्ही अशा स्थितीत अर्धा तास पडून होतो. बिबवेवाडी पोलिसांनी तेथील नागरिकांच्या मदतीने आमच्या दोघांच्या अंगावरील पत्रे व सामान बाजूला करत आम्हा दोघांना झोपडीतून सुखरूप बाहेर काढले. याघटनेत आम्ही दोघे पूर्णपणे घाबरून गेलो होतो. या घटनेच्या वेळेस आम्हाला वाटले की आम्ही आता खरंच जिवंत राहू शकणार नाही परंतु बिबवेवाडी पोलीस देवासारखे धावून आल्याने आमचा जीव वाचला. बिबवेवाडी पोलिसांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद त्यांनी मानले.

Post Bottom Ad

#

Pages