😱पुण्यातील फायनांन्स व्यावसायीकाला सायबर चोरट्यांनी ५० लाखांचा घातला गंडा - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 8, 2019

😱पुण्यातील फायनांन्स व्यावसायीकाला सायबर चोरट्यांनी ५० लाखांचा घातला गंडा💁‍♂पुणे शहरातील एका फायनांन्सरला सायबर चोरट्यांनी ५० लाखांचा गंडा घातला आहे. अवघ्या तीन दिवसात विविध २८ बॅंक खात्यात त्याने हे पैसे वर्ग केले आहे. विशेष म्हणजे फायनांन्सरचा बॅंक खात्याला कनेक्‍ट असलेला नंबर बंद करुन तोच नंबर बनावट कागदपत्राच्या आधारे स्वत: घेत ही फसवणूक करण्यात आली आहे.
 
👉अजित प्रल्हाद काळे(वय ३९, रा.लोणीकाळभोर,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा स्वत:चा फायनांन्सचा व्यवसाय आहे. हा सर्व प्रकार २६ ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घडला आहे.

🚨पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी राहण्यास लोणी काळभोर परिसरात आहेत. त्यांचा फायनान्सचा व्यावसाय आहे. त्यांचे खडक परिसरात ऑफिस आहे. दरम्यान, त्यांचे व्यावसायिक बँक खाते आहे. फिर्यादी हे कामानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे गेले होते. त्यांचा मोबाईल क्रमांक हा बँक खात्याशी संलग्न होता. त्याच कालावधीत चोरट्यांनी मोबाईल नंबर बंद करुन आयडीया कंपनीकडे बनावट कागदपत्रे सादर करुन त्याच नंबरचे नवीन सीम कार्ड स्वत: घेत बँक खात्याशी तोच नंबर संलग्न करून बँक खात्यावरून ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या २८ बँक खात्यात एकूण ५० लाख रुपये ट्रान्सफर केले. यानंतर दुसऱ्या दिवसी त्यांना मोबाईलवर काही ओटीपीचे एसएमएस आणि बॅंक खात्यातून पैसे काढल्याचे एसएमएस आले. यानंतर त्यांनी बॅंकेत धाव घेत खात्यातील रक्कम तपासली असता ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या खात्यावरून ५० लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी खडक पोलीसांकडे तक्रार दिली. या तक्रारीची प्राथमीक चौकशी करण्यात आली. त्यानंतर अज्ञात चोरट्यान विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा उत्तम चक्रे करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages