पिस्तूल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 13, 2019

पिस्तूल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद

पिस्तूल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद

पुणे शहरात ताडीवाला रोड रस्त्यावर अवैध्यरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद करत त्याच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काढतूस हस्तगत केले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत.

सराईत गुन्हेगार शगुन जोगदंड (24,रा.ताडीवाला रस्ता) असे आरोपीचे नाव असून बंडगार्डन पोलिसांनी याच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काढतूस जप्त करत अटक केली आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी दिलेल्या माहितीनूसार,
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील शगुन जोगदंड हा गुन्हेगार आहे. तो पिस्तुल घेऊन ताडीवाला रस्ता परिसरात फिरत असल्याची खबर पोलीस कर्मचारी निखील जाधव व कैलास डुकरे यांना मिळाली होती. तो पिस्तुलाचा वापर करुन एखादा गंभीर गुन्हा करण्याची शक्‍यता लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे यांना याची खबर देण्यात आली. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे व पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. तपास पथकाचे पोलीस हवालदार संतोष पागार, नवनाथ डांगे, हरीश मोरे, पोलीस नाईक अय्यज दड्डीकर, कैलास डुकरे, रुपेश पिसाळ, पोलीस शिपाई निखील जाधव, किरण तळेकर यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे पिस्तुल आणी एक काडतूस आढळले.
सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages