🔥बिबवेवाडीत लागलेल्या भीषण आगीत दोन झोपड्या जळून खाक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, December 2, 2019

🔥बिबवेवाडीत लागलेल्या भीषण आगीत दोन झोपड्या जळून खाक💥बिबवेवाडी परिसरात शिवराय नगर येथे आज दुपारी कॅटरिंगचे काम करत असताना उडालेला आगीच्या भडक्यामुळे झोपडीला आग लागून लागलेल्या भीषण आगीत भवरलाल खरताजी भाट्टी (वय 55) व भिमराव प्रल्हाद लंगर (वय 56) या दोघांच्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


👉भवरलाल खरताजी भाट्टी (वय 55, रा.गल्ली नंबर 22, शिवराय नगर, बिबवेवाडी, पुणे 37) यांनी त्यांची झोपडी ईश्वर माली (वय 50) यांना भाडेतत्त्वावर दिली आहे. या झोपडीमध्ये ईश्वर माली हे केटरिंगचे काम करतात. घटनेच्या वेळी झोपडीमध्ये दिनेश कुमार, अशोक, आण्णा, ईश्वर हे केटरिंगचे काम करत होते. शेजारील घराला आग लागून या आगीमध्ये भिमराव प्रसाद लंगर (वय 56, रा. गली नंबर 22,शिवराय नगर,बिबवेवाडी,पुणे 37) यांचे आगीत संसार उपयोगी साहित्य जळून पूर्ण खाक झाले असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहेत.


💥मिळालेल्या माहितीनुसार,
पुणे शहर बिबवेवाडी परिसरात शिवराय नगर येथे आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास कॅटरिंगचे काम करत असतांना उडालेल्या आगीच्या भडक्यामुळे झोपडीला आग लागून दोन झोपड्या जळाल्या. या घटनेची माहिती समाजसेवक अनिल राठोड यांनी पोलिसांना व अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून बिबवेवाडी पोलिसांनी जमलेल्या बघ्यांची गर्दीला बाजूला करून कात्रज अग्निशमन केंद्रातील तांडेल भाऊ शिंदे, ड्रायव्हर - गणेश भंडारे, देवदूत ड्रायव्हर - प्रतीक शिर्के, फायरमन - प्रसाद कदम,भरत भारती,सागर इंगळे,तुषार पवार,श्रीकांत वाघमोडे व कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे ड्रायव्हर - काळे, फायरमन - फडतरे,जगताप,सुतार,देवदूत ड्रायव्हर - माळवदकर यांनी  घटनास्थळी पोहोचून जळालेल्या झोपड्यांवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले व जळलेल्या झोपड्यांचे पत्रे बाहेर काढून आत मध्ये असलेले 5 लिकेज सिलेंडर बाहेर काढून मोकळ्या जागेत आणून ठेवले. अग्निशमन दलातील जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे लिकेज सिलेंडरचा स्फोट होण्याची मोठी दुर्घटना टळली. आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या 3 फायर गाड्या व 3 देवदूत गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या.


आगीच्या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी मदतीला आले धावून
सर्वे नंबर 658/7 शिवराय नगर,अप्पर-कोंढवा रोड,बिबवेवाडी,पुणे 37 या ठिकाणी लागलेल्या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बिबवेवाडी प्रभागातील प्रभाग क्रमांक 37 मधील नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, भीमराव साठे, दिनेशभाऊ धाडवे, गणेश मोहिते यांनी घटना स्थळाची पोहचून आगीमध्ये बाधित झालेल्या झोपडीतील नागरिकांची विचारपूस करून घडलेल्या घटनेची माहिती घेत योग्य त्या पद्धतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

Post Bottom Ad

#

Pages