😱 लग्नात मद्यपान करून आल्याने हाकलून दिल्याच्या रागातून कोंढव्यात सराईत गुन्हेगाराने हवेत केला गोळीबार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, December 9, 2019

😱 लग्नात मद्यपान करून आल्याने हाकलून दिल्याच्या रागातून कोंढव्यात सराईत गुन्हेगाराने हवेत केला गोळीबार💁‍♂लग्नात मद्यपान करून आल्यानंतर त्याला हाकलून दिल्याच्या रागातून झालेल्या वादात कोंढव्यात सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


👉विनोद चिमुला असे हवेत गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात विनोद त्याचा मित्र रवी लोखंडे याच्यासह साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रवी याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मोहसीन आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
रवी याचा मित्र विशाल याच्या बहिणीचे लग्न होते. त्या ठिकाणी रवी हा मद्यपान करून आला होता. त्यावेळी मोहसीन आणि विशाल यांनी त्याला येथून जाण्यास सांगितले. यावरून वाद झाला. दुसऱ्या दिवशी रवी व इतर रात्री मोहसीन याच्या घरी गेले. त्याठिकाणी वाद झाला. वादातून तुफान हाणामारी झाली. यावेळी विनोद याने हवेत गोळीबार केला. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Post Bottom Ad

#

Pages