🚨तळजाई टेकडीवर झालेल्या एका वेटरच्या खुनाचे गूढ उलगडून सहकारनगर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, December 5, 2019

🚨तळजाई टेकडीवर झालेल्या एका वेटरच्या खुनाचे गूढ उलगडून सहकारनगर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद



💁‍♂तळजाई टेकडीवर 30 नोव्हेंबर रोजी आढळून आलेल्या एका वेटरच्या खुनाचे गूढ उलगडले असून या खून प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. शिवीगाळ केली म्हणून सराईत गुन्हेगाराने त्याच्या चेहऱ्यावर वार करून त्याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

👉रवी सिराज भारती (वय 38, रा. टिहरी गढवाल, उत्तराखंड) असे खून झालेल्या वेटरचे नाव असून या प्रकरणी दत्तात्रय बापूराव मिसाळ (वय 28 रा. तळजाई वसाहत, पद्मावती) या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

🚨सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
तळजाई टेकडीवर 30 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर वार करण्यात आल्यामुळे त्याची ओळख पटवणे अवघड होते. त्याच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरून तो उत्तराखंड येथील असून हॉटेलमध्ये वेटर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे तपास करून पोलिसांनी संशयावरून मिसाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता मिसाळ याचा भारती याच्याबरोबर काही कारणावरून वाद झाला होता. त्या वादातून भारती याने मिसाळ याला शिवीगाळ केली म्हणून रागाच्या भरात मिसाळ याने खून केला.

Post Bottom Ad

#

Pages