😱मद्यधुंद चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने दोन तरुणीला दिली धडक; एकीचा घटनास्थळी मृत्यू - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 7, 2019

😱मद्यधुंद चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने दोन तरुणीला दिली धडक; एकीचा घटनास्थळी मृत्यू💁‍♂चुनाभट्टी परिसरात भरधाव कारने फूटपाथवर चालणाऱ्या तरुणीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. चुनाभट्टी येथील धावजी मार्गावर काल (६ डिसेंबर) रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास एमएच ०५ बीजे ३९२० क्रमांकाची असलेली कार दत्त मंदिर जवळून व्ही. एन. पूरव मार्गावर जात होती. त्यावेळी कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या कारमध्ये एकूण चार तरुण होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीत चालकासोबत तिघेजण होते, त्यातील दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

👉या अपघातात अर्चना कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने पार्टे वय (१९वर्षे) तरूणीला धडक मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी तरुणीला शेजारील दळवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पार्टे कुटुंबाने चुनाभट्टी पोलिस चौकीला घेराव घालत ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत वाहन चालकाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृत्यू अर्चना पार्टेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आणि चुनाभट्टीतील रहिवाशांनी नकार दिला होता.

Post Bottom Ad

#

Pages