😱हिंजवडी परिसरात मोकळ्या मैदानात एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 4, 2019

😱हिंजवडी परिसरात मोकळ्या मैदानात एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला💁‍♂पुण्यातील हिंजवडी परिसरात गुन्हेगारी वारंवार डोके वर काढत आहे. हिंजवडी परिसरात मागील काही दिवसांत अनेक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आलीये. आता पुन्हा एक धक्कादायक घटना या परिसरातून समोर आली आहे. मारूंजी येथील कोलते पाटील सोसायटी जवळील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि.४) सकाळी याघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

👉मृत तरुण निलेश नाईक (वय २५, सध्या रा. सुस, मूळ कोल्हापूर) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. निलेश हा स्केटींगचा खेळाडू आणि प्रशिक्षक होता. दारू पिऊन झालेल्या भांडणात हा खून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येतीय.

🚨मारुंजी येथे मोकळ्या मैदानात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना बुधवारी सकाळी मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. मृतदेहाच्या जवळ बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. मृत तरुण निलेश नाईक (वय २५, सध्या रा. सुस, मूळ कोल्हापूर) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. निलेश हा स्केटींगचा खेळाडू आणि प्रशिक्षक होता. रात्री दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages