🎞 ट्रोलिंगला न जुमानता अभिषेकने युजरला दिले सडेतोड उत्तर - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, December 9, 2019

🎞 ट्रोलिंगला न जुमानता अभिषेकने युजरला दिले सडेतोड उत्तर


💁‍♂आजकाल अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते त्यांच्या जीवनातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण याच कलाकारांना बऱ्याच वेळा सोशल मीडियावर ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागते. कलाकार सोशल मीडियावर ट्रोल होणे हा एक ट्रेंडचा झाला असे म्हणायला हरकत नाही. पण हिच कलाकार मंडळी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामद्वारे यूजर्सला उत्तर देतानाही दिसतात. अशीच वेळ अभिनेता अभिषेक बच्चनवर आली. पण या ट्रोलिंगला न जुमानता अभिषेकने युजरला सडेतोड उत्तर दिले आहे.

🗣गेल्या काही वर्षांपासून अभिषेक बच्चन चित्रपटसृष्टीपासून लांब असल्याचे पाहायला मिळते. अनेक चाहत्यांना तो चित्रपटात काम का करत नाही असा प्रश्न पडतो. नुकताच एका यूजरने अभिषेक बच्चनला ‘गेल्या तीन वर्षांपासून एकही चित्रपट केलेला नाही तरी देखील तुझ्याकडे फिरण्यासाठी पैसे आहेत. कसे काय?’ असे लिहित ट्विट केले आहे.

🗣यूजरच्या त्या ट्विटवर अभिषेकने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘सर, कारण चित्रपट निर्मिती आणि अभिनयाच्या व्यतिरिक्त माझे इतरही काही व्यवसाय आहेत. खेळ हा त्याचाच एक भाग आहे’ असे लिहित अभिषेकने यूजरला उत्तर दिले आहे.

Post Bottom Ad

#

Pages