🔫 पिस्टलने परिसरात दहशत करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारला कोंढवा पोलीसांनी एक वर्षाकरिता केले हद्दपार... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 24, 2019

🔫 पिस्टलने परिसरात दहशत करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारला कोंढवा पोलीसांनी एक वर्षाकरिता केले हद्दपार...

🔫 पिस्टलने परिसरात दहशत करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारला कोंढवा पोलीसांनी एक वर्षाकरिता केले हद्दपार...

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न व गोळीबार असे 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच लष्कर, हडपसर व वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गंभीर दुखापत करणे असे एकूण 7 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार आतिक इक्बाल शेख यांची पुणे शहरात वानवडी, कोंढवा, हडपसर भागात दहशत वाढत चालली असल्यामुळे त्याच्या अशा कृत्यांना आळा बसावा म्हणून मा.पोलिस उप आयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे यांनी शनिवार (दि. 21 डिसेंबर) रोजी पासून एक वर्ष करता पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून मुंबई येथे हद्दपार केले आहे.

कुख्यात गुन्हेगार अतिक इक्बाल शेख (वय 34, रा. सय्यद नगर,हडपसर,पुणे) याच्यावर पुणे शहरात वानवडी, कोंढवा, हडपसर पोलीस स्टेशनमध्ये स्वतःजवळ पिस्टल बाळगत गंभीर दुखापत करणे असे एकूण 7 गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर आदेश क्रमांक 26/2019 अन्वये मु.पो.आधी नियम सन 1951चे कलम 56 (1) ब प्रमाणे शनिवार (दि. 21 डिसेंबर) रोजी पासून एक वर्ष करता पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून मुंबई येथे हद्दपार केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोंढवा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार अतिक इक्बाल शेख (वय 34, रा. सय्यद नगर,हडपसर,पुणे) याच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न व गोळीबार असे 2 गुन्हे दाखल असून लष्कर पोलीस स्टेशन येथे पिस्टल बाळगल्या बद्दल व खूनाचा कट रचणे असे गुन्हे दाखल आहे. तसेच हडपसर व वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गंभीर दुखापत करणे असे एकूण 7 गंभीर गुन्हे केले आहे. अतिक इक्बाल शेख हा स्वतःजवळ नेहमीच पिस्टल बाळगायचा तो पिस्टलच्या जोरावर कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बांधकाम व्यावसायिक, व्यापारी वर्ग, नोकरदार, छोटे व्यवसायिक इत्यादीनां हत्याराचा धाक दाखवून धमकावून हप्ते गोळा करत बळजबरीने भांडणे काढून आपले वर्चस्व प्रस्थापित करीत होता. त्याच्या दहशतीमुळे कोणीही उघडपणे तक्रार देणे अगर साक्ष द्यायला पुढे येत नसल्याने परिसरातील नागरिक दडपणा मध्ये वावरत आहेत.

पुणे शहरात वानवडी, कोंढवा, हडपसर भागात दहशत वाढत चालली असल्यामुळे त्याच्या अशा कृत्यांना आळा बसावा म्हणून मा.पोलिस उप आयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे यांनी त्यांच्याकडील आदेश क्रमांक 26/2019 अन्वये मु.पो.आधी नियम सन 1951चे कलम 56 (1) ब प्रमाणे शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी पासून एक वर्ष करता पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून मुंबई येथे हद्दपार केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages