🔥कोंढवामध्ये कुमार सुरक्षा सोसायटीमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला शॉकसर्किटने लागली भीषण आग - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 17, 2019

🔥कोंढवामध्ये कुमार सुरक्षा सोसायटीमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला शॉकसर्किटने लागली भीषण आग🔥कोंढवामध्ये कुमार सुरक्षा सोसायटीमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला शॉकसर्किटने लागली भीषण आग
कोंढवा बुद्रुक परिसरातील वेलकम हॉल मागील कुमार सुरक्षा सोसायटीमध्ये लोटस बिल्डिंगच्या पाचव्या मजल्या वरील क्र.503 फ्लॅटला शॉकसर्किटने आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होत. अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली आहे. याआगीत फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुसकान होत संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
पुणे शहर कोंढवा परिसरात कुमार सुरक्षा सोसायटी मधील "लोटस बिल्डींग" च्या पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाच्या फ्लॅटला सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने आगीमध्ये घरात असलेला सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होताच अग्निशामक दलाने बिल्डींग मधील रहिवाशांना बाहेर काढत आगीवर पाण्याचा मारा करत अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. या आगीमुळे पाचव्या मजल्यावरील शेजारी असलेल्या फ्लॅटला आगीची झळ लागून व आगीच्या धुराचे लोड घरामध्ये शिरून घर पूर्णपणे काळे झाले. आगीची घटना घडताच बिल्डींग मधील रहिवाशांनी जीव मुठीत धरून फ्लॅट मधून बाहेर पडले. घटनास्थळी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल होत. आग लागलेल्या फ्लॅटची पाहणी करत घडलेल्या घटनेची माहिती घेतली.
कुमार सुरक्षा सोसायटी मधील "लोटस बिल्डिंगच्या" पाचव्या मजल्यावरील 503 फ्लॅटचे मालक पंकज कालिका तिवारी (वय 45) यांनी सांगितले की,
आग लागण्याच्या आधी एक महिन्यापूर्वीच घराचे रेनोवेशन करण्यात आले होते. आग लागण्याच्या प्रथम फ्रिजच्या मागील बाजू येथून धूर येऊ लागला बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले या आगीमध्ये संसार उपयोगी वस्तूं व मौल्यवान वस्तू जळून खाक होत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Post Bottom Ad

#

Pages