👌विक्रमचा चंद्रावरील पत्ता शोधण्यात नासाच्या शास्त्रज्ञांना एका भारतीयाने मदत केल्याची खुद्द नासाने दिली माहिती - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 3, 2019

👌विक्रमचा चंद्रावरील पत्ता शोधण्यात नासाच्या शास्त्रज्ञांना एका भारतीयाने मदत केल्याची खुद्द नासाने दिली माहिती💁‍♂भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान २च्या विक्रम लँडरचा पत्ता अखेर सापडला आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने याबाबत माहिती दिली. नासाच्या ऑर्बिटरने विक्रमचे फोटो पाठवले आहेत. पण विक्रमचा चंद्रावरील पत्ता शोधण्यात नासाच्या शास्त्रज्ञांना एका भारतीयाने मदत केल्याची माहिती खुद्द नासाने दिली आहे. शनमुगा सुब्रमण्यम असं या इंजिनीअरचं नाव आहे.


👉शनमुगा सुब्रण्यमने केली मदत
भारताच्या चांद्रयान २ मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लाग
ले होते. विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणे गरजेचे होते. पण अवघ्या २.१ किमी अंतरावर असताना लँडरचा संपर्क तुटला. त्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण काही दिवसांनी शोधमोहीम थांबवण्यात आली. दरम्यान आज नासाने त्यांच्या ऑर्बिटरने काढलेली विक्रम लँडरची छायाचित्रं ट्विट करुन माहिती दिली. विक्रम लँडरचे अवशेष सापडल्याचा दावा नासाने केला आहे. शनमुगानं सर्वप्रथम ज्या ठिकाणी लँडर आदळले, तेथून जवळपास ७५० मीटरवर अवशेष पाहिले,’ असं नासानं म्हटलं आहे. अनेकांनी विक्रमसंबंधी माहिती मिळवण्यासाठी छायाचित्रे डाउनलोड केली. त्यातील शनमुगानं अवशेषांचा शोध लावला आणि एलआरओसीला माहिती दिली, असं नासानं सांगितलं.


🗣कठोर मेहनतीनं लँडरचा शोध घेतला
भारतीय इंजिनिअर शनमुगा सुब्रमण्यम याने सांगितले की, “विक्रम लँडरचा संभाव्य मार्ग शोधण्यासाठी कठोर मेहनत केली. मी खूपच खूश आहे. अंतराळातील घडामोडी जाणून घेण्याची मला पहिल्यापासूनच आवड आहे,” असं तो म्हणाला.

Post Bottom Ad

#

Pages