😱पुण्यात ३४ वर्षीय महिलेला पाहून रिक्षाचालकाने केले हस्तमैथुन - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, December 17, 2019

😱पुण्यात ३४ वर्षीय महिलेला पाहून रिक्षाचालकाने केले हस्तमैथुन

😱पुण्यात ३४ वर्षीय महिलेला पाहून रिक्षाचालकाने केले हस्तमैथुन

पिंपळे सौदागर परिसराची उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळख असून या परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३४ वर्षीय महिलेला पाहून एका रिक्षाचालकाने हस्तमैथुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी महिलेने प्रथम याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, रिक्षाचालकाने पुन्हा असे कृत्य केल्याने महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सांगवी पोलीस या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पिंपळे सौदागर परिसरात फिर्यादी ३४ वर्षीय महिला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पतीसह सोसायटीच्या गेटबाहेरील दुकानात पाव खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पती हे शेजारील दुसऱ्या दुकानात दूध आणण्यासाठी गेले. तेव्हा ३४ वर्षीय फिर्यादी खरेदी करून दुकानाच्या बाहेर येत असताना त्यांच्याकडे पाहून अनोळखी रिक्षाचालक हस्तमैथुन करत असल्याचे निदर्शनास आले. फिर्यादी यांनी पतीला बोलावण्याचा प्रयत्न केला असता तोपर्यंत रिक्षाचालक पळून गेला. फिर्यादी यांनी त्यावेळी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. परंतु, दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास असाच किळसवाणा प्रकार घडला. फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी कॉफी शॉपवर गप्पा मारत थांबल्या होत्या. तेव्हा रिक्षाचालक तेथे आला आणि त्याने फिर्यादीकडे पाहून अश्लील हावभाव करत हस्तमैथुन करू लागला. या घटने प्रकरणी संबंधित रिक्षाचालकाचा रिक्षा क्रमांक घेऊन फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विकृत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

सांगवी पोलिसांचे आवाहन,
एम.एच.१२-क्यू.आर-१४७१ या संबंधित क्रमांकाची रिक्षा कोणाला दिसल्यास सांगवी पोलीस ठाण्याच्या संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages