🔫BREAKIN Hyderabad Rape and Murder Accuse Encounter - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, December 6, 2019

🔫BREAKIN Hyderabad Rape and Murder Accuse Encounter



🔫BREAKIN हैदराबाद डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर


💁‍♂हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी चकमकीत ठार (Hyderabad Rape and Murder Accuse Encounter) झाले आहेत. आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू या चौघा आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी काल मध्यरात्री एन्काऊंटर केला. तपासादरम्यान पळून जात असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवला होता.


👉हैदराबाद पोलिस चारही आरोपींना 5 डिसेंबरच्या मध्यरात्री साडेतीन वाजता घटनास्थळी घेऊन गेले होते. गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निर्मिती करत असताना चौघांनी पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात चौघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तिथून जवळच हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ही चकमक घडली.


काय आहे प्रकरण ?
हैदराबादमधील शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यक तरुणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तिची हत्या करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवून दिला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी 26 वर्षीय पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर 29 तारखेला चारही आरोपींना अटक झाली होती. या घटनेविरोधात अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.

▪ माझ्या मुलाला जाळून टाका, हैदराबाद गँगरेप प्रकरणातील आरोपीच्या आईची मागणी

▪ बुधवार 27 नोव्हेंबरला संध्याकाळी डॉक्टर तरुणीला टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करुन जाताना चारही आरोपींनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या डोक्यात कट शिजू लागला. त्यांनी तिच्या स्कूटीमधली हवा काढली. रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेव्हा ती स्कूटी नेण्यासाठी तिथे पुन्हा आली, तेव्हा तिला टायर पंक्चर झाल्याचं लक्षात आलं.

▪ आरोपी मोहम्मद आरिफ तिच्याजवळ मदतीच्या बहाण्याने पोहचला. तर शिवा स्कूटी दुरुस्त करतो, असं सांगून ती दूर घेऊन गेला. त्यानंतर आरिफ, शिवा आणि नवीन तिला बळजबरी एका मोकळ्या जागेवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. स्कूटी दूरवर नेऊन सोडल्यानंतर शिवा परत आला आणि त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

▪ डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी तिला बळजबरी मद्य पाजलं होतं. तिने मदतीसाठी याचना केली, मात्र नराधमांना पाझर फुटला नाही. किळसवाणी बाब म्हणजे तिने प्राण सोडल्यानंतर तिच्या मृतदेहासोबतही आरोपी बलात्कार करत राहिले.

▪ हत्येनंतर आरोपी तिचा मृतदेह ट्रकवर टाकून निघाले. वाटेत पेट्रोल आणि डिझेल विकत घेतलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील शादनगरमध्ये एका निर्जनठिकाणी त्यांनी तिचा मृतदेह टाकला. त्यानंतर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

◼ चौघाही आरोपींच्या आईनी आपल्या मुलाला कोणतीही शिक्षा द्या, ती आपल्या मंजूर असेल, अशी भूमिका घेतली होती. ‘मलाही एक मुलगी आहे. त्यांनी (आरोपी) त्या पीडित मुलीला ज्याप्रकारे पेटवलं, त्याचप्रमाणेच माझ्या मुलालाही जाळून टाका. मला काही त्रास होणार नाही’ अशी खंबीर भूमिका चिन्ना केशवुलूच्या आईने घेतली होती.

Post Bottom Ad

#

Pages