😱बटाट्याच्या नावावर कांद्याची तस्करी करणाऱ्याला DRI ने केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 7, 2019

😱बटाट्याच्या नावावर कांद्याची तस्करी करणाऱ्याला DRI ने केली अटक

महसूल गुप्तवार्ता संचलनालय म्हणजेच DRI ने एका कांदा तस्कराला अटक केली आहे. ऐकायला जरी चमत्कारीक वाटत असलं तरी ही गोष्ट खरी आहे. सध्या देशभरात कांद्याच्या दरावरून रणकंदन माजलं आहे. देशाच्या काही भागांमध्ये कांद्याने प्रतिकिलो 150 रुपयांचा दर ओलांडला आहे. कांदा दरवाढीचा काही जण फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती DRI ला मिळाली होती. या माहितीवरून केलेल्या तपासादरम्यान ही अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सनी मद्धेशिया असल्याचं कळतंय. त्याला नेपाळच्या महाराजगंजमधील नौतनवा भागातून अटक करण्यात आली. सनीवर आरोप हा आहे की त्याने 3600 क्विंटल कांद्याची नेपाळला तस्करी केली होती. या कांद्याची सध्याची किंमत 2 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. सनीने बटाटा पाठवत असल्याचं सांगून त्याने कांदा नेपाळला पाठवला होता. DRI ला कांदा तस्करीची कुणकुण लागल्याने त्यांनी नेपाळमधल्या नौतनवा भागावर आधीच लक्ष ठेवलं होतं. त्यांना चौकशीदरम्यान बटाट्याच्या नावाखाली कांदा पाठवला गेल्याचं कळालं. चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे सनीला अटक करण्यात आली.

कांद्याचे दर भरमसाठ वाढल्याने त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र फक्त नफा मिळवायच्या मागे लागलेल्या व्यापाऱ्यांनी गुपचूप पद्धतीने कांदे इतर देशात पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अटक केलेल्या सनीने नेपाळमध्ये कांदा पाठवण्यासाठी बटाटा विकत असल्याचं सांगून बिलं बनवली होती. या बिलांच्या आधारे तो कांद्याची तस्करी करत होता. सनीने चौकशीदरम्यान त्याच्याच सारखी तस्करी करणाऱ्या अजून काही जणांची नावे सांगितली आहे. DRI आता त्यांच्याही मागावर आहे.

हिंदुस्थान नेपाळ सीमेवर असलेल्या सोनौली मार्गे या कांद्यांची तस्करी सुरु होती. कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी असल्याचं कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलं माहिती आहे. तरीही या मार्गाने कांदा तस्करी झाल्याने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई रोखली गेली आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं असावं किंवा लाच घेऊन कांदा सोडला असावा अशा दोनच शक्यता आहे ज्यामुळे ही तस्करी शक्य झाली असावी असं तपास अधिकाऱ्यांना वाटत आहे.

Post Bottom Ad

#

Pages