😱 आळंदी पॅटर्न DY बोईज नावाने हातात शस्त्र घेऊन टिकटॉक व्हिडीओद्वारे दहशत पसरविणाऱ्या तरुणांची तुरुंगात रवानगी... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, December 21, 2019

😱 आळंदी पॅटर्न DY बोईज नावाने हातात शस्त्र घेऊन टिकटॉक व्हिडीओद्वारे दहशत पसरविणाऱ्या तरुणांची तुरुंगात रवानगी...

😱 "आळंदी पॅटर्न DY बोईज" नावाने हातात शस्त्र घेऊन टिकटॉक व्हिडीओद्वारे दहशत पसरविणाऱ्या तरुणांची तुरुंगात रवानगी...

सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्यासाठी TikTok हे सगळ्या प्रसिद्ध आणि लोकांचं आवडतं माध्यम आहे. सध्या देशात काय चाललं आहे असं मजेन विचारलं तर TikTok सुरू आहे असं लोक म्हणतात. तरुणाईला तर या TikTokने वेड लावलं आहे. पण अशाच काही तरुणांना हे टिकटॉक इतकं महागात पडलं की थेट तरुंगाची वारी करण्याची वेळ आली. हातात शस्त्र घेऊन टिकटॉक व्हिडीओद्वारे दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुण आणि शाळकरी विद्यार्थ्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आल्याची घटना आळंदीत घडली आहे.

आळंदीतील या तरुणांनी "मुळशी पटर्न" चित्रपटातील दृश्य आणि डायलॉगवर आधारित व्हिडिओ तयार करून तो "आळंदी पॅटर्न  DY बोईज" नावाने टिकटॉकवर अपलोड केला होता. या व्हिडिओला अनेकांनी पाहिलं आहे. त्यानंतर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आणि त्यांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेत तरुणांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पोलिसांनी व्हिडिओची माहिती मिळवून तरुणांचा शोध घेतला आणि त्यानंतर सर्वांना तात्काळ अटक केलं. व्हिडीओ तयार करतांना या तरुणांनी वापरलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली असून हा प्रकार दहशत पसरविण्याच्या उद्धेशाने केल्या गेल्या असल्याचा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे. आठ पैकी सहा तरुणांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. दरम्यान, टिकटॉकवर व्हिडीओ तयार करतांना कायद्याचं उल्लंघन होणार नाही किंवा दहशत पसरणार याची खबरदारी तरुणांनी घ्यायला हवी असं अहवानही चौधर यानी केलं आहे. त्यामुळे पुणेकरांनो टिकटॉकवर व्हिडिओ बनवताना नेमका कोणता व्हिडिओ तयार करताय याची काळजी नक्की घ्या.

Post Bottom Ad

#

Pages