😱धक्कादायक घटना...ITBP जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; 6 जवानांचा मृत्यू - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 4, 2019

😱धक्कादायक घटना...ITBP जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; 6 जवानांचा मृत्यू💁‍♂ITBP जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळाबार केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात घडली आहे. आपसांत झालेल्या वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहेत. मात्र या गोळीबारात सहा ITBP जवानांचा मृत्यू झाला आहे. जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर अशाप्रकारे गोळीबार करणे ही दुर्घटना अत्यंत वाईट आहे. या दुर्घटनेत आणखी काही जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.


👉सहा जवानांचा मृत्यू 
छत्तीसगड हा नक्षलवादी भाग आहे. या भागात नेहमी नक्षलवादी कारवाया केल्या जातात. नक्षलवादी लष्काराच्या जवानांवर हल्ला करण्याच्या अनेक घटना याअगोदर समोर आल्या आहेत. नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या या कारवायांमध्ये बऱ्याचदा सर्वसामान्यांना देखील आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे या भागत एका ऑपरेशनसाठी ITBP चे जवान तैनात करण्यात आले होते. मात्र, या दरम्यान जवानांध्येच मतभेद होऊन त्यांच्या वाद झाल्याची घटना घडली आणि यात एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केले. या गोळीबारात काही जवान गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांना हॅलिकॉप्टरमार्फत रायपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सहा जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages