👑 Jamaican Tony Ann Singh Miss World 2019..Miss France won second place, Miss India Suman Rao third - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, December 15, 2019

👑 Jamaican Tony Ann Singh Miss World 2019..Miss France won second place, Miss India Suman Rao third

👑 जमैकाची टोनी अॅन सिंह 2019 ची विश्वसुंदरी..मिस फ्रांसला दुसरे, मिस इंडिया सुमन रावला तिसरे स्थान मिळाले

जगाला यावर्षीची मिस वर्ल्ड 2019 मिळाली आहे. जमैकाची टोनी अॅन सिंह 2019 ची विश्वसुंदरी ठरली आहे. फ्रान्स, ब्राझील, जमैका आणि नायजेरियासमवेत भारताची सुमन राव मिस वर्ल्डच्या स्पर्धेच्या शर्यतीत तिसरे स्थान मिळाले, मिस फ्रांस ही दुसऱ्या स्थानावर होती तर मिस जमैका यंदाची विश्वसुंदरी ठरली. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरमन जुलिया मॉर्ले यांनी टोनीचे नाव घोषित केले, तर मागच्या वर्षीची मिस वर्ल्ड व्हेनेसा पोन्से हिने टोनीला मिस वर्ल्डचा मुकुट घातला.

Toni-Ann Singh from Jamaica is the 69th #Missworld pic.twitter.com/tgyTFFiuKU
— Miss World (@MissWorldLtd) December 14, 2019

मिस वर्ल्ड हा फार मानाचा किताब आहे आणि म्हणूनच जेव्हा टोनीचे नाव घोषित केले गेले तेव्हा क्षणभर तिला आनंदाचा धक्काच बसला. आपले स्वप्न सत्यात उतरले आहे याच्यावर तिचा विश्वासच बसला नाही. शेवटी मिस नायजेरियाने जेव्हा तिला आनंदाने मिठी मारली तेव्हा ती भानावर आली. त्यानंतर स्टेजवर तिने सर्वांना अभिवादन केले. मिस वर्ल्ड स्पर्धेचे हे 69 वे वर्ष होते. यंदाचा हा सोहळा लंडन इथे पार पडला. या स्पर्धेत 100 पेक्षा अधिक देशांच्या सुंदरींनी भाग घेतला होता. आजच्या या कार्यक्रमावेळी 2020 ची मिस वर्ल्ड स्पर्धा थायलंड इथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

We have the biggest hearts and most talented people!
Congratulations @toniannsingh on winning the crown #MissWorld2019.
You made us so proud. Continue to be a fantastic role model for our young women in Jamaica.
Miss Jamaica to the world! 🇯🇲 pic.twitter.com/2pBBlOzoU3
— Andrew Holness (@AndrewHolnessJM) December 14, 2019

विश्वसुंदरी टोनी ही फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्र विद्यार्थीनी आहे. तिला वैद्यकीय डॉक्टर व्हायचे आहे. यापूर्वी तिने कॅम्पसमध्ये कॅरिबियन विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तिच्या मोकळ्या वेळात टोनीला गाणे गाणे, स्वयंपाक करणे, ब्लॉगिंग करणे, समाजसेवा करणे आवडते. महत्वाचे म्हणजे ती क्लासिकल ऑपेरा सिंगर आहे. आज या मिस वर्ल्ड गोष्टीचे श्रेय टोनी आपल्या आईला देते.

भारताची सुमन राव विषयी माहिती :- सुमन मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याआधी नवी मुंबईतील महात्मा एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षण घेत होती. सुमन ही सीए ची विद्यार्थिनी होती. सुमन रावने Miss Uttar Pradesh 2019 चाही किताब जिंकला आहे. तसेच सुमन हिने 2018 मध्ये पार पडलेल्या मिस नवी मुंबई सौंदर्य स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक मिळवला होता.

Post Bottom Ad

#

Pages