😱 लर्निंग वाहन L चालकांमुळे 23 हजार लोकांचा मृत्यू; वाहतूक मंत्रालयाचा अहवाल - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, December 11, 2019

😱 लर्निंग वाहन L चालकांमुळे 23 हजार लोकांचा मृत्यू; वाहतूक मंत्रालयाचा अहवाल


😱 लर्निंग वाहन L चालकांमुळे 23 हजार लोकांचा मृत्यू; वाहतूक मंत्रालयाचा अहवाल

रस्त्यांवरुन दिवसाला लाखो हजारो वाहने फिरताना दिसून येतात. मात्र काही वाहनांवर L हे अक्षर लिहिलेले दिसते. L या अक्षराचा गाडीवर असणारा खरा अर्थ म्हणजे चालक अद्याप गाडी शिकत आहे. त्याचसोबत लर्निंग लायन्स असलेल्या चालकाना वाहन चालवण्याचा अचूक अंदाज सुद्धा नसल्याचे पहायला मिळते. तर वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालातून लर्निंग वाहन चालकांमुळे 23 हजारांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये दुचाकी चालकांसह चारचाकी गाड्यांचा सुद्धा समावेश आहे.

परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार :- 2018 मध्ये लर्निंग लायसन्स असलेल्या चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आली आहे. त्यामुळेच हजारोंच्या संख्येने रस्ते अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात दुचाकी किंवा चार चाकी वाहन चालकांकडे लर्निंग लायसन्स असल्याचे उघड झाले आहे.

आरटीओचे सेवानिवृत्त रविंद्र सिंह यांनी याबाबत असे म्हटले आहे की,
लर्निंग लायसन्स असलेले चालक एकट्याने वहान चालवू शकत नाही. तसेच जरी त्यांना वाहन चालवायचे असल्यास त्यांनी गर्दीच्या ठिकाणांच्या येथून चालवणे टाळावे. त्याचसोबत जर चालक गाडी शिकत असल्यास त्याच्या सोबत प्रशिक्षक असणे अत्यावश्यक आहे. वाहनाच्या पुढील आणि पाठील बाजूल शिकत असताना L हे अक्षर लावणे महत्वाचे असून त्याची लांबी 6 इंच असावी. या नियमाचे पालन न केल्यास 100 ते 500 रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात येते.

तर 1 सप्टेंबर पासून देशभरात वाहतुकीचे नवे नियम (New Traffic Rules) लागू होत आहेत. केंद्र सरकारने नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार देशात वाहतुक कायदा राबवला जाणार आहे. या नियमांची वाहतूक पोलीस कठोर अंमलबजावनीही करणार आहेत. त्यामुळे वाहतूक कायदा अथवा वाहतूक नियम भंग होईल असे वर्तन करु नका. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा अशा अनुक्रमे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.

Post Bottom Ad

#

Pages