🚨अवैध्य हुक्का पार्लरवर कोंढवा पोलिसांची कारवाई 2 आरोपीस केली अटक... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, January 20, 2020

🚨अवैध्य हुक्का पार्लरवर कोंढवा पोलिसांची कारवाई 2 आरोपीस केली अटक...

🚨अवैध्य हुक्का पार्लरवर कोंढवा पोलिसांची कारवाई 2 आरोपीस केली अटक...

कोंढवा परिसरात अवैधरित्या राजरोसपणे चालू असलेल्या हुक्का पार्लरवर कोंढवा पोलिसांनी छापा टाकून 2 आरोपींना अटक करत 17 हजार 560 रुपयांचा हुक्का पार्लरमधील साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहेत. रविवार रात्री 12:20 वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी हुक्का पार्लरचा चालक-मालक ओम राजेंद्र तांदळे (वय 37, राहणार. प्रेमानंद सोसायटी,बालाजी नगर,धनकवडी,पुणे)
हुक्का पार्लर मधील कामगार पवन कुमार किसन बहादुर छत्री उर्फ सावंत (वय 22, राहणार. गजानन नगर,कोंढवा बुद्रुक,पुणे) यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात 70/2020 सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018चे कलम 4अ, 21अ अन्वये गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.
हुक्का पिणारे ग्राहक
1) शुभम गुप्ता (वय 22, राहणार. गंगाधाम,मार्केट यार्ड,पुणे)
2) हरीश शहा (वय 22, राहणार. आंध्रप्रदेश)
3) रमेश चौधरी (वय 23, राहणार. गणेश पेठ पुणे)
4) जितेंद्र कांबळे (वय 35, राहणार. गुलटेकडी,पुणे) यांस कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर कोंढवा परिसरात रविवार दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुशील धिवार व अमोल फडतरे यांच्या खात्रीशीर बातमीदाराकडून कोंढवा बुद्रुक,गजानन नगर येथील ओंकार रेसिडेन्सी शेजारील बिल्डिंगमध्ये अवैध्य रित्या हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती मिळताच ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार व सूचनेप्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांचा मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाडकर, पोलीस नाईक सुशील धिवार,अमोल फडतरे, पोलीस शिपाई किरण मोरे,राकेश चव्हाण यांनी रविवार रात्री 12:20 वाजण्याच्या सुमारास बातमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोहोचून अवैध रित्या चालू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून हुक्का पार्लरचा चालक-मालक ओम राजेंद्र तांदळे (वय 37, राहणार. प्रेमानंद सोसायटी, बालाजी नगर,धनकवडी,पुणे), हुक्का पार्लर मधील कामगार पवन कुमार किसन बहादुर छत्री उर्फ सावंत (वय 22, राहणार. गजानन नगर,कोंढवा बुद्रुक,पुणे) यांच्यासह हुक्का पिणारे ग्राहक 1) शुभम गुप्ता (वय 22, राहणार. गंगाधाम,मार्केट यार्ड,पुणे), 2) हरीश शहा (वय 22, राहणार. आंध्रप्रदेश), 3) रमेश चौधरी (वय 23, राहणार. गणेश पेठ पुणे), 4) जितेंद्र कांबळे (वय 35, राहणार. गुलटेकडी,पुणे) यांस ताब्यात घेत 17 हजार 560 रुपयांचा हुक्का पार्लरमधील साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. आरोपी हुक्का पार्लरचा चालक-मालक ओम राजेंद्र तांदळे, हुक्का पार्लर मधील कामगार पवन कुमार किसन बहादुर छत्री उर्फ सावंत यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात 70/2020 सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018चे कलम 4अ, 21अ अन्वये गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.

यामुळेच कोंढवा पोलिसांना अवैध्य हुक्का पार्लरचा लागला नाही सुगावा...
अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता हुक्का पार्लरच्या मालक ओम तांदळे याने सांगितले की, त्याचे याआधी मार्केटयार्ड येथे अवैध्य हुक्का पार्लर चालवत होता. या हुक्का पार्लरमध्ये येणाऱ्या खात्रीशीर ग्राहकांची त्याने एक खास ओळख निर्माण केली होती. मार्केटयार्ड पोलीसांनी अवैधपणे चालू असलेल्या हुक्का पार्लर बंद केल्याने ओम तांदळे याने ओंकार बिल्डिंगच्या शेजारी,गजानन नगर,कोंढवा बुद्रुक येथे अवैद्य पणे हुक्का पार्लर चालू केले. या हुक्का पार्लरमध्ये येणारे ग्राहक हे त्याचे पूर्वीच्या खात्रीशीर ग्राहकांनाच हुक्का पार्लर मध्ये तो येऊन देत असल्याने कोंढवा पोलिसांना याचा सुगावा लागला नाही.

सदरचे कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.पोलीस सहा-उपायुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे गुन्हे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री.विष्णू वाडकर, पोलीस नाईक - श्री.सुशील धिवार, श्री.अमोल फडतरे, पोलीस शिपाई - श्री.किरण मोरे, श्री.राकेश चव्हाण यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages