😱पुण्यात 'हनी ट्रॅप' मध्ये अडकवत लाखोंची खंडणी मागणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचा पोलिसांनी केला पर्दाफाश.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, January 26, 2020

😱पुण्यात 'हनी ट्रॅप' मध्ये अडकवत लाखोंची खंडणी मागणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचा पोलिसांनी केला पर्दाफाश..

😱पुण्यात 'हनी ट्रॅप' मध्ये अडकवत लाखोंची खंडणी मागणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचा पोलिसांनी केला पर्दाफाश..

पुणे शहरातील नामांकित कंपन्यांच्या एचआरशी नोकारीसाठी संपर्क साधून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. याघटने प्रकरणी एका 20 वर्षीय तरुणीला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद करत तरुणीच्या अन्य साथीदार मात्र फरार झाले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे.

एका 56 वर्षीय व्यक्तीने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या विरुद्ध चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीकडून 2 मोबाइल व 13 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी तरुणी मूळची अहमदनगर जिल्ह्यातील आहे. नोकरीच्या निमित्ताने ती पुण्यात आली होती. काही दिवस तिने रांजणगाव परिसरातील एका कंपनीत नोकरी केली. त्यानंतर कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या हव्यासापायी तिने हा ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला. या कामात तिला तिचे मित्र सहकार्य करत होते.
संबंधित तरुणी शहरातील विविध कंपन्यांच्या एचआरचे संपर्क क्रमांक प्राप्त करायची यानंतर त्यांच्याशी नोकरीच्या निमित्ताने बोलायची. त्यानंतर व्हॅटस्‌ऍपवर चॅटिंग करून जवळीक साधायची. एचआर जाळ्यात अडकत आहे, असे समजताच त्याला भेटण्यासाठी बोलावत असे. त्याच्या गाठीभेटी घेतल्यानंतर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असे. या प्रकारची एक तक्रार गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामध्ये आरोपी तरुणीने फिर्यादीकडे 7 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यातील 45 हजार रुपये तरुणीने स्वीकारले होते. उरलेल्या पैशांसाठी ती सतत फिर्यादीच्या मागे तगादा लावत होती. तिच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने गुन्हे शाखेकडे धाव घेतली. यानंतर गुन्हे शाखेतील पोलिसांनी सापळा रचण्यात आला. आरोपी तरुणीही खंडणीचे पैसे घेण्यासाठी खराडी बायपास रोडवर येणार असल्याची माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिली होती. त्यानुसार गुन्हे शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, पोलिस कर्मचारी सुनील चिखले, महेश कदम, कोकरे, यांच्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपी तरुणीस पैसे घेताना रंगेहाथ ताब्यात घेत माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी मुलीला 29 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशाच प्रकारे तरुणीने अनेकांना गंडा घातल्याचा पोलिसांचा अंदाज व्यक्त आहे.

20 वर्षीय तरुणीची कोणत्याही थराला जाण्याची तयारी… 
संबंधित तरुणी फक्त वीस वर्षांची असून ती इतकी सराईत आहे की, ती कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवते. तिने अशा प्रकारे ट्रॅपमध्ये अडकवलेल्या काही व्यक्तींनी तिच्या त्रासाला कंटाळून अगदी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. तिचे साथीदारही ब्लॅकमेलिंग करण्यात पटाईत असून सध्या ते फरार झाले आहेत.

सदरची कामगिरी,
मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री.अशोक मोराळे, मा. उपायुक्त श्री.बच्चन सिंह, मा. गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक श्री.राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री.निलेशकुमार महाडिक, पोलिस कर्मचारी श्री.सुनील चिखले, श्री.महेश कदम, श्री.कोकरे, महिला पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages