😱एकाच रात्रीत सराफांची दोन दुकाने फोडूण चोरट्यांनी 21 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, January 17, 2020

😱एकाच रात्रीत सराफांची दोन दुकाने फोडूण चोरट्यांनी 21 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला...

😱एकाच रात्रीत सराफांची दोन दुकाने फोडूण चोरट्यांनी 21 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला...

पिंपरीत एकाच रात्रीत वाकड आणि रहाटणीत सराफांची दोन दुकाने फोडण्यात आली. यामध्ये 21 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

1) फिर्यादी मनोहर पूनसिंग चौहान (वय 30, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांचे बळीराज कॉलनी, काळेवाडी येथील अंबिका ज्वेलर्स नावाच्या सोन्या-चांदीच्या दुकानातून चोरट्यांनी 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.
2) फिर्यादी प्रविण रामचंद्र देवकर (वय 36, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांचे कस्पटे वस्ती, वाकड येथे कनक ज्वेलर्स नावाच्या सोन्या-चांदीच्या दुकानातून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्‍कम असा 19 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
दोन्ही घटनेत मिळून चोरट्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्‍कम असा एकूण 21 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बुधवारी रात्री 9:00 ते गुरूवारी सकाळी 8:00 वाजताच्या दरम्यान फिर्यादी मनोहर पूनसिंग चौहान (वय 30, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांचे बळीराज कॉलनी, काळेवाडी येथील अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान कुलूप लावून बंद होते. या कालावधीत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटउन आतील लोखंडी ग्रिल कापून दुकानात प्रवेश करत दुकानातील 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. मनोहर पूनसिंग चौहान (वय 30, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांनी गुरुवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेप्रकरणी वाकड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करत पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत,
फिर्यादी प्रविण रामचंद्र देवकर (वय 36, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांचे कस्पटे वस्ती, वाकड येथे कनक ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीच्या दुकानात बुधवारी रात्री 9:00 ते गुरूवारी सकाळी 7:00 वाजणाच्या सुमारास फिर्यादी देवकर यांचे दुकान कुलूप लावून बंद होते. या दरम्यान चोरट्यांनी दुकानाचे सेंट्रल लॉक तोडून शटर उचकटून दुकानात प्रवेश करत दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्‍कम असा एकूण 19 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. देवकर यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते चोरट्यांनी चोरी केली आहे, हे सीसीटीव्हीद्वारे पोलिसांना माहिती मिळू नये म्हणून चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग करणारा 15 हजार रुपये किंमतीचा डीव्हीआरही चोरून नेला आहे. प्रविण रामचंद्र देवकर (वय 36, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी गुरुवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत वाकड पोलीस याबाबत पुढिल तपास करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages