🚨जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांचा छापा; 25 आरोपींना अटक करत 3 लाख 18 हजार 740 मुद्देमाल जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, January 24, 2020

🚨जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांचा छापा; 25 आरोपींना अटक करत 3 लाख 18 हजार 740 मुद्देमाल जप्त..

🚨जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांचा छापा; 25 आरोपींना अटक करत 3 लाख 18 हजार 740 मुद्देमाल जप्त..

शिरूर- गोपाळ वस्ती येथील इमारतीमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलीस उप अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्या पथकाने कारवाई करून 1 लाख 66 हजार 640 रोख रकमेसह एकूण 3 लाख 18 हजार 740 मुद्देमाल जप्त करुन जुगार खेळणाऱ्या 25 आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शिरूर तालुक्‍यात सर्वांत मोठी कारवाई करत एवढ्या आरोपींना अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

क्‍लबचा मालक नाना गव्हाणे याच्यासह 25 आरोपींवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
शिरूर येथील गोपाळ वस्ती येथे अवैध पत्त्यांचा क्‍लब सुरू असल्याची माहिती दौंड विभागाच्या पोलीस उप अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांना बातमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. 23) दुपारी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अपर अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे, बारामती क्राईम ब्रॅंचचे निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस कर्मचारी सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल आयवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीसी पथकातील सात पुरुष, पाच महिला, दोन पोलीस जवान यांच्या पथकाने हा छापा टाकत अवैध पत्त्यांचा क्‍लबचा मालक नाना गव्हाणे याच्यासह 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages