👌जम्मू-काश्मीर पोलिसांनी 26 जानेवारीला होणाऱ्या दहशवादी हल्ल्याचा कट उधळलत 5 दहशवाद्यांना केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, January 16, 2020

👌जम्मू-काश्मीर पोलिसांनी 26 जानेवारीला होणाऱ्या दहशवादी हल्ल्याचा कट उधळलत 5 दहशवाद्यांना केली अटक..

👌जम्मू-काश्मीर पोलिसांनी 26 जानेवरीला होणाऱ्या दहशवादी हल्ल्याचा कट उधळलत 5 दहशवाद्यांना केली अटक..

जम्मू-काश्मीर गुरुवारी 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, या दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. असे सांगितले जात आहे की, हे लोक 26 जानेवारीला ग्रेनेडने हल्ला करण्याची तयारी करत होते. या 5 जणांना पोलिसांनी अटक करून त्यांचा कट उधळून लावला आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी..
1) एजाज अहमद शेख
2) उमर हमीद शेख
3) इमतीयाज अहमद चिकला
4) साहिल फारूकी गोजरी
5) नसीर अहमद मीर
या 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी आणखी 2 हिजबुल अतिरेक्यांसह डीएसपी देवेंद्र सिंह यांनाही अटक करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 8 जानेवारी रोजी हजरतबलजवळ हबक क्रॉसिंगवर सीआरपीएफ पक्षाच्या पार्टीवर संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात 2 नागरिक जखमी झाल्याबाबत गुन्हा दाखल करत तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजसह इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले होते. गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा ठावठिकाणा घेत त्यांच्या घरांवर छापे टाकत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले दहशतवादी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सुमारास श्रीनगरमध्ये हल्ल्याचा कट रचत होते. या अतिरेक्यांकडून जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
काश्मीरमध्ये हद्दपार झालेला डीएसपी देवेंद्र सिंह दहशतवाद्यांसह पकडला गेला. त्यावेळी या दहशतवाद्यांचे मोठे षडयंत्र समोर आले आहे. अटक केलेले हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे चिडलेले होते आणि त्याचा बदला घेण्यासाठी पंजाब, दिल्ली, चंदीगडमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते. या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून डीएसपी देवेंद्र सिंहला अटक करत त्यांना सर्व सेवांवरून निलंबित करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages