🚨 दुचाकी चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक; 3 दुचाकी व 10 मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, January 4, 2020

🚨 दुचाकी चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक; 3 दुचाकी व 10 मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त...


🚨 दुचाकी चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक; 3 दुचाकी 10 मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त...

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असतांना कोंढवा पोलिसांना बातमीदाराकडून वाहनचोरी व इतर गुन्ह्यामध्ये सक्षम सहभाग असणारे गुन्हेगार हे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणार असल्याची मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा रचून दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 3 दुचाकी व 10 मोबाईल हँडसेट असे एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील एक आरोपी हा विधिसंघर्षग्रस्त बालक आहे.

दुचाकी चोर आरोपी सतीश मोहन चव्हाण (वय 16, रा.हांडेवाडी रोड,पुणे) व त्यांसमवेत विधिसंघर्षग्रस्त बालक करण रोहिदास हाडे यांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी पुणे शहर हद्दीत वाहन चोरी सारखे व इतर गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याकरिता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांनी गुन्हे शाखा मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी पेट्रोलिंग व गस्त घालण्याबाबत आदेशित केल्यानुसार कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असतांना पोलीस नाईक अमित साळुंखे,पोलीस शिपाई ज्योतीराम पवार यांना खात्रीशीर बातमी दाराकडून वाहनचोरी व इतर गुन्ह्यामध्ये सक्षम सहभाग असणारे गुन्हेगार हे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणार असल्याची बातमी मिळताच लागलीच त्यांनी सदर बातमी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांना माहिती देत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस ठाणे हद्दीमध्ये सापळा रचून दोन संशयित आरोपी सतीश मोहन चव्हाण (वय 16, रा.हांडेवाडी रोड,पुणे) व त्यांसमवेत विधिसंघर्षग्रस्त बालक करण रोहिदास हाडे यांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत व पुणे शहर परिसरात विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबूल दिली. त्यांच्याकडून कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर भादवि कलम 379 नुसार गुरन 1012/19 मधील चोरी झालेली बजाज कंपनीची पल्सर दुचाकी क्र - MH.12.HP. 9283, लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील चोरीच्या गुन्ह्यातील ॲक्टिवा दुचाकी क्र - MH.12.HP.7313, होंडा शाईन दुचाकी तसेच 10 मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख रुपये रकमेचा माल जप्त करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री.सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस हवालदार - नाईक, पोलीस नाईक - धिवार, वनवे, कळंबे, साळुंखे, पोलीस शिपाई - पवार, शेलार, चव्हाण, वळे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages